आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद/ पिंपळगाव पेठ - अंगावर राॅकेल टाकून पेटवून दिल्याने गंभीर जखमी झालेल्या अंधारी (ता. सिल्लोड) येथील महिलेचा (वय ५०) औरंगाबाद घाटी रुग्णालयात बुधवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. रविवारी रात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर या महिलेस रात्री १.५१ वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. मात्र, ९५ टक्के भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आपल्या बहिणीने शरीरसुखासाठी नकार दिल्यावर संतोष सखाराम माेहिते याने जाळले, असा आरोप पीडितेच्या भावांनी केला. पोलिसांनुसार, आरोपीनेच तिला आपल्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. पीडितेच्या जबाबामुळे हा बनाव उघडकीस आला. आरोपी संतोष याचा गावातच बिअर बार आहे. त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणाशी पीडितेच्या मुलीचे लग्न झाले आहे. प्रचंड कमाई सुरू झाल्यानंतर आरोपी संतोष याने गावात दहशत निर्माण केली होती, अशी माहिती समोर येत आहे. आरोपी संतोष यास पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने १० फेब्रुवारीपर्यंत पोलिस काेठडी सुनावली.
काय घडले रविवारी रात्री? :
पोलिसांनुसार, रविवारी रात्री ११ नंतर संतोष पीडितेच्या घरी गेला. महिलेने विरोध केला तरी तो घरात शिरला आणि महिलेस मारहाण सुरू केली. नंतर त्याने घरातच पडलेली राॅकेलची कॅन तिच्या अंगावर उलटी केली आणि पेटवून दिले.
ती ओरडत होती, दार बंद करून तो पळाला :
महिला आकांताने ओरडू लागताच त्याने घराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावली आणि निघून गेला. काही वेळाने पुन्हा आला. ती जिवंत होती. त्याने तिला घाटीत हलवले. सकाळपर्यंत आरोपी घाटीतच होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.