आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुर्खा काढण्यास नकार दिल्यामुळे महिलेला मेट्रोमध्ये चढण्यापासून रोखले, लखनऊमध्ये घडला धक्कादायक प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ(उत्तर प्रदेश)- येथील मेट्रो स्टेशनवर बु्र्खा घातलेल्या 5 मुस्लिम महिलांना लखनऊ मेट्रोमधून प्रवास करण्यास रोखले. या पाचही महिला एकाच कुटुंबातील आहेत. मंगळवारी या महिला मालवीय नगर मेट्रो स्टेशनवर प्रवास करण्यासाठी पोहचल्हा होत्या.


मिळालेल्या माहितीनुसार एकाच कुटुंबातील 5 महिला लखनऊच्या मालवीय नगर मेट्रो स्टेशनवर प्रवास करण्यासाठी. तिथे त्यांना महिला सुरक्षाकर्मचाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या चेकिंगवर कोणतीच हरकत नव्हती.  पण, मेट्रो स्टेशनवर एकही महिला सुरक्षाकर्मचारी उपस्थित नव्हती. त्यामुळे तिथे असलेल्या पुरूष सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मेट्रोमधून प्रवास करण्यापासून रोखले. 


महिलांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत करण्याची मागणी केली. या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील प्रमुखे एम. अहमदने या घटनेची तक्रार लखनऊ मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला पाठवली. तर दुसरीकडे मेट्रोच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर पुष्पा बेलानीने यांनी तक्रार मिळाल्याचे सांगितले आहे तसेच तपास करून आरोपींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.