महाराष्ट्र-गुजरात सीमेवर भीषण अपघात, बस दरीत कोसळून 12 प्रवासी जखमी

अपघातात 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत

दिव्य मराठी वेब टीम

Apr 28,2019 04:01:00 PM IST

नंदुरबार- महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील सापुतारा येथे एका वळणावर खासगी बस अनियंत्रित झाल्याने बस घाटात पडताना थोडक्यात बचावली आहे. बस दरीच्या वरच्याच बाजुला थांबल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.

बस सुरतवरून सापुतारा येथे जात असतांना अपघात घडला आहे. बस चालकाचे बसवरील निंयत्रण सुटल्याने बस दरीत पडली, पण ती खाली न जाता वरच अडून बसली त्यामुळे या अपघातात कुठल्याही प्रकाराची जीवितहानी झालेली नाहीये. पण या अपघातात 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

X
COMMENT