आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस आणि ट्रकची टक्कर; चालकासह २५ जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद - नागपूर महामार्गावरील आसना पुलाजवळ सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमाराला राज्य परिवहन महामंडळाची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन २५ जण जखमी झाले. अर्धापूर पोलिस व सुरक्षा महामार्गाच्या पोलिसांनी जखमींना तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. 


नांदेडहून पुसदकडे येणारी राज्य महामंडळाची बस (क्र. एम. एच. २० बी. एल. १७४०) आणि भोकर फाटाकडून नांदेडकडे जाणारा ट्रक (क्र. एम. एच. २४ ए. बी. ६९७०) यांच्यात आसना पुलाजवळील दशमेश पेट्रोल पंपाजवळ सकाळी सहा वाजताच्या सुमाराला समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील अविनाश राठोड (३०) रा. दिंडाळा, ता. उमरखेड, श्रीकृष्ण कवडे (४५, रा. चिंचगव्हाण, ता. हदगाव) दयानंद गजभारे (३३, रा. धनेगाव), राजाबाई जाधव (५० ) रा. हदगाव, तुकाराम जाधव (४८, रा. केरुर, ता. बिलोली), विजय इंगोले (४३, रा. नांदेड), प्रवीण येडके (३१, रा. नांदेड), बापूराव पाटील (५०, रा. बेलखेड, ता. उमरखेड), पंडित नरवाडे (५३, रा. बदलापूर, मुंबई), संभाजी गुंडे (रा.अंबुलगा, ता. कंधार), अशोक नालमवार (६३, रा. नांदेड) अभिजित नालमवार (३०, रा. नांदेड) सय्यद सैदू सय्यद महेबूब (५२, रा. नवी आबादी), कविता मुळे (२८, रा. अरेगाव, ता. पुसद), संतोष मुळे (३५, रा. अरेगाव, ता.पुसद), नंदकिशोर महाजन (२७, रा. हदगाव), पंकज पवार (२७, रा. दराटी, ता. उमरखेड), रिजवानबी शेख याकूब (२२, रा. हडसणी, ता. माहूर), भाऊराव मस्के (४२) नांदेड, चांगुना लहाने (४७, रा. नांदेड), जगदीश मामीडवार (५५, रा. नांदेड), सचिन बिगानिया (२९, रा. नाशिक), शंकर काळे (४०, रा. मोहनदरी, ता. उमरखेड), काशीनाथ चव्हाण (५९, रा. हदगाव) हे प्रवासी जखमी झाले. 


जखमींमध्ये बस चालक 
अर्धापूर पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव मांजरमकर व त्यांचे सहकारी आणि सुरक्षा महामार्गाचे सपोनि एस. रहेमान व त्यांचे सहकारी यांनी सर्व जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बसचालक डी.एम. गजभारे हेही अपघातात जखमी झाले अाहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...