Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | bus burn on nashik road

नाशिकराेडला शहर बस अचानक पेटली

प्रतिनिधी | Update - Jan 08, 2019, 02:37 PM IST

या कारणामुळे लागली आग

 • bus burn on nashik road

  नाशिक - मार्गावर धावणारी एमएच १५ एके ८०९७ क्रमांकाची बस नाशिकरोड येथील बिटको सिग्नलच्या पुढील थांब्यावर थांबली. मात्र, बसचे लायनर हे ड्रमला चिकटल्याने त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. चालक व्ही. एस. कदम आणि वाहक यू. आर. मोरे यांच्यासह बारा प्रवासी बसमध्ये बसलेले होते. चालकाला धुराबाबत काहीही समजलेले नव्हते, परंतु बस थांब्याबाहेर चहा पिण्यासाठी उभे असलेले नागरिक तसेच मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार बघितला. त्यांनी त्वरित हा प्रकार चालकाच्या लक्षात अाणून दिला. तर सूरज सगर आणि जनार्दन घंटे यांनी अग्निशमन दलाला माहिती कळविली. तोपर्यंत बसमधील १२ प्रवाशांना वाहकाने खाली उतरवून घेतले होते.


  त्यानंतर धुराचे लोट वाहत असताना अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यापूर्वी येथील भाजीविक्रेत्यांनीही त्यांच्याकडील पाण्याचा मारा करत अाग विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही अाग अाटाेक्यात येत नसल्याचे पाहून चालक कदम यांनी थेट बसखाली जाऊन धूर निघत असलेल्या ठिकाणी पाणी मारून आग विझविली. यावेळी सूरज सगर, जर्नादन घंटे, महेंद्र अरिंगळे, वाहक यू. आर. चौरे यांच्या अग्निशमन दलाचे जवान आणि भाजीविक्रेत्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला.

  नशीब बलवत्तर असल्याने अाग लागल्याचे लवकर लक्षात अाले : चालक, वाहक आणि प्रवाशांचे नशीब चांगले की, बस या ठिकाणी उभी होती. त्यावेळी धूर निघत असल्याचे तेथे उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात हा प्रकार अाला. प्रवाशांचे नशीब बलवत्तर होते म्हणून हा प्रकार लवकर लक्षात आला. आग वाढली असती तर माेठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शी सूरज सगर यांनी सांगितले.


  का लागली आग
  शहर बसेस ब्रेक लावण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले लायनर हे ड्रमला चिकटले गेले होते. ते एकमेकांवर घासून त्या ठिकाणी घर्षणामुळे आग लागल्याने धूर निघू लागला. हा प्रकार लवकर लक्षात आला म्हणून गंभीर प्रकार टळला, असे बसचे चालक व्ही. एस. कदम यांनी सांगितले.

Trending