Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Bus collapses; 22 survivors escaped

बस मंडपाला धडकली; 22 प्रवासी बचावले: चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवितहानी

प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 10:27 AM IST

पुसद आगाराची बस हिंगोलीमार्गे जात होती.

  • Bus collapses; 22 survivors escaped

    हिंगोली - मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसद येथे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे कळमनुरी येथे ती बसस्थानकाजवळील लमानदेव मंदिराजवळील सभा मंडपाला या बसने धडक दिली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील २२ प्रवासी बालंबाल बचावले.


    हिंगोली-नांदेड महामार्गावरून एम. एच. ४० एन. ८५६७ या क्रमांकाची पुसद आगाराची बस हिंगोलीमार्गे जात होती. मात्र, कळमनुरी शहरापासून काही अंतरावर बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. वेग जास्त असल्याने शेवटी चालकाने प्रसंगावधान बाळगून रस्त्यापासून जवळच असलेल्या लमानदेव मंदिराकडे बस वळवून सभा मंडपाला धडक दिली. चालकाच्या या सतर्कतेमुळे बसमधील २० प्रवाशांचे प्राण वाचले.


    जखमींमध्ये चालक शेख याकूब शेख अब्दुल(५१) रा. वसंतनगर पुसद, वाहक नीलकंठ वाघमारे (५४) रा. पुसद, वैशाली राजेश धुळधुळे (२८), स्वराज राजेश धुळधुळे (२), अंश धुळधुळे(५) रा. आखाडा बाळापूर, आशिष पाईकराव(१४) रा. शेनोदी, राजेश चोखाजी धुळधुळे (३२), रा. बाळापूर, ताराबाई भीमराव मोरे(६०), पुसद, आनंद गुंजकर (५) कळमनुरी, तबसूल बेगम हाजी शेख ताहेर (६५), हाजी शेख ताहेर शेख आहेमद (७१) हिंगोली, मधुकर भारत कंठाळे (२५) जिंतूर, बाळू राजू जाधव (३५) चंद्रकलाबाई जाधव (२८), पायल जाधव (५) खडकदरी, ता. पुसद, मारुती खुडे(६५)रा. हिंगोली, सय्यद इब्राहिम सय्यद ताजे(४५) रा. हिंगोली, शिवशंकर भंडारी(३४) रा. शेंबाळपिपरी, सुनील सुरोशे(२७) रा. खडकदरी ता. पुसद, पंडितराव बोरकर(६८) हिंगोली यांचा समावेश आहे. जखमी प्रवाशांवर जखमी प्रवाशांवर कळमनुरी येथील तालुका रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना रात्री नांदेड येथे हलवण्यात आले असून किरकोळ जखमी झालेल्यांना आज कळमनुरी येथील रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Trending