आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bus Conductor Passed UPSC Exam By Studding For 5 Hours After Doing 8 Hours Conductor Job Without Any Coaching.

बस कंडक्टर 8 तासांची नोकरी आणि कोणत्याही कोचिंगविना 5 तास अभ्यास करून झाला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : एका बस कंडक्टरने नोकरीसोबतच रोज 5 तासभय करून यूपीएससी परीक्षा पास केली आहे. 29 वर्षांचा मधु एनसी बीएमटीसीमध्ये बस कंडक्टर आहे. त्याने यूपीएससीची प्री आणि मेन्स परीक्षा पास केली आहे आणि 25 मार्चला तो मुलाखत देणार आहे. मधुच्या कुटुंबीयांमध्ये एक भाऊ, वाहिनी आणि आई वडील आहेत. मधुच्या आईला यूपीएससीचा अर्थ किंवा त्याचे माहित नाहीये पण मुलाच्या या यशावर त्यादेखील खूप खुश आहे. 

मधु 2014 मध्ये कर्नाटक प्रशासनिक सेवा परीक्षेमध्ये नापासही झाला आहे. 2018 च्या यूपीएएसी परीक्षेमध्ये त्याला यश मिळाले नव्हते, पण त्याने धीर सोडला नाही. त्याने सांगितले कीं, तो रोज कमीत कमी पाच तास अभ्यास करतो. 

आयएएस अधिकाऱ्याच्या मदतीने केला अभ्यास... 

मधुचा हा प्रवास खूप कठीण झाला आहे. तो रोज आठ तास कंडक्टरचे काम करायचा. दिवसभर उभे राहून तिकीट वाटणे, गर्दीत प्रवाश्यांना बोलावणे आणि हे सुनिश्चित करणे की, एखादा प्रवासी विना तिकीट राहू नये. हे काम खूप थकवणारे आहे. तरीदेखील मधुने नोकरी सोडली नाही. 

त्याचे म्हणणे आहे की, मुलखात क्लियर करून ती आपले सध्याचे बॉस म्हणजे बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर आयएएएस सी शिखा सारखे बानू इच्छिते. सी शिखाबद्दल मधुने सांगितले, 'त्या माझी खुपमदत करत आहेत. मेन्स परीक्षेसाठी त्या प्रत्येक आठवड्याला मला दोन तास शिकवायच्या की, परीक्षेत उत्तरे कशी लिहायची. आता त्या मला मुलाखतीसाठीही तयार करत आहेत.' मधुच्या बाबतीत हे सर्व पहिल्यांदा झालेले नाही.  

पॉलिटिकल सायन्स विषयामध्ये दिली मेन्स परीक्षा...  

मागच्यावर्षी प्री-परीक्षेचा निकाल आल्यानंतरच मधुने मेन्ससाठी जोमाने अभयास केला. मेन्स परीक्षेसाठी मधुने पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, एथिक्स, लँग्वेज यांच्यासोबत अनेक विषयांचा खूप अभ्यास केला. त्याने मेन्स परीक्षेमध्ये पर्यायी विषय म्हणून पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स निवडले होते. त्याने प्री-परीक्षा तर कन्नडमध्ये दिली होती. पण मेन्स त्याने मध्ये दिली.