आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयविकाराच्या झटक्याने बस चालकाचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संग्रामपूर- काल २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगांव जामोद आगाराची एम.एच. ०६ / ८८०६ या क्रमांकाची बस वानखेड गावात मुक्कामी गेली होती. दरम्यान आज सकाळी नेहमी प्रमाणे गावातील नागरिकांनी सकाळच्या आरती साठी बस चालक मोहन वासुदेव राणे वय ३५ वर्ष रा. आपोती जि. अकोला यांना आवाज दिला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 


त्यामुळे नागरिकांनी बसमध्ये जावून पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत दिसून आले. त्यांना तत्काळ वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात वडील, दोन लहान भाऊ, पत्नी व तीन वर्षाची मुलगी आहे. 

बातम्या आणखी आहेत...