आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल डेस्क/कटक - ओडिशाच्या कटकमध्ये जगतपुरच्या जवळ मंगळवारी एक बस म्हशीला धडकून महानदीवर बनलेल्या पुलाचा कठडा तोडून 30 फूट खोल कोसळली. या अपघातात 12 जण ठार झाले आहेत, तर 49 जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांसोबत मिळून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मृतांमध्ये 3 महिला आणि 9 पुरुष सामील आहेत.
अपघातावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख
रिपोर्टनुसार, बस कटकवरून अंगुलकडे जात होती. अपघातात म्हैसही दगावली. अपघातानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दु:ख व्यक्त केले. त्यांनी आसपासच्या रुग्णालयांना जखमींवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृताच्या नातेवाइकांना 2-2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.