आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाऊसवाइफसाठी बेस्ट आहेत हे 4 बिझनेस, 30 हजार रुपयांत होऊ शकते सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः ई-कॉमर्स प्लॅटफार्मने घरबसल्या बिझनेस सुरु करण्याच्या अनेक संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. गृहिणींना मुलांना घरी सोडून बाहेर जाण्याची गरज नाही. घरी बसून लोणची, होम मेड बेकरी, चॉकलेट, कँडल बनवण्याचे व्यवसाय तुम्ही सुरु करु शकता आणि त्यातून चांगली कमाईदेखील हाऊ शकते. हे सर्व व्यवसाय 30 हजार रुपयांत सुरु होऊ शकतात.

 

होम मेड लोणची
दिल्लीच्या विष्णू गार्डन येथे राहणा-या नानकी सिंह त्यांच्या घरासाठी लोणची बनवायच्या. त्यांच्या घरच्या मंडळींना त्यांनी केलेले लोणचे आवडत होते. त्यांनीच लोणची बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला. त्या स्थानिक मार्केटमधून पॅकिंग मटेरियल घरी घेऊन आल्या आणि एक पॅकिंग मशीन खरेदी केली. घरातील गच्चीवर त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आणि आपले प्रॉडक्ट लोकल बाजारात विकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी घरी केलेल्या लोणच्यांची डिमांड वाढू लागली. आता त्या सर्व मोठ्या रिटेल चेनला घरगुती लोणची सप्लाय करतात.

 

तुम्हीही लोणची बनवण्याचा व्यवसाय आपल्या घरी सुरु करु शकता. यासाठी फक्त 10 हजारांची गुंतवणूक तुम्हाला करावी लागेल. यामध्ये रॉ मटेरियल आणि पॅकिंग मशीन तुम्हाला खरेदी करावी लागले. लोणची तुम्ही  ऑनलाइन, ठोक, रिटेल मार्केट आणि रिटेल चेनमध्ये विकू शकता.

 

पुढील स्लाईडवर वाचा - दुस-या बिझनेसविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...