आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पन्नास हजारांत सुरू करा हा बिझनेस; मुलांचे भविष्य सुधारण्यासोबतच होईल लाखोंची कमाई

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नव्या वर्षात तुम्ही एखादा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा बिझनेसविषयी सांगणार आहोत ज्यापासून तुम्ही महिन्याला लाखोंची कमाई करु शकता. या बिझनेसपासून तुम्हाला फायदा तर होईलच. परंतू याने मुलांचे भविष्यसुद्धा सुधरेल. तुम्ही हा बिझनेस छोट्याशा जागेत सुरू करु शकता. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास हजारांची गुंतवणूक करावी लागेल. 

 

पन्नास हजारांत बिझनेस सुरू करण्याची संधी
'माय छोटा स्कूल' नावाचे प्ले स्कूल लोकांना आपल्यासोबत बिझनेस सुरू करण्याची संधी देत आहे. त्यासाठी तुम्हाला 50 हजारांची गंतवणूक करुन या स्कूलची फ्रेंचायजी घ्यावी लागणार आहे. खास गोष्ट म्हणजे तुम्ही या स्कूलला चार खोल्यांच्या घरातसुद्धा सुरू करु शकता. या प्ले स्कूलच्या आतापर्यंत देशात 150 शाखा खोलण्यात आल्या असून त्यात ग्रामीण क्षेत्र, तालुका, छोट्या शहरांचादेखील समावेश आहे. 

 

पुढील स्लाइडवर वाचा- छोट्या शहरातील लोकांसाठी सुवर्ण संधी
 

बातम्या आणखी आहेत...