आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिझनेस डेस्क- एक काळ असा होता की, तारकेश्वरीला आपली छोटी आॉर्डर पूर्ण करणे कठीण होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या एका योजनेने तारकेश्वरीचे नशीबच बदलून गेले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली. त्यापैकी एक आहे मुद्रा लोनची स्किम.
मुद्रा स्किमअंतर्गत तारेश्वरी यांना 5 लाखाचे कर्ज मिळाले. या कर्जामुळे त्यांनी एका वर्षात 75 लाखांचा व्यवसाय केला. तेव्हापासून त्यांच्या व्यवसायात वृद्धी होत गेली. तारेश्वरी यांनी फक्त त्यांचा व्यवसाय वाढवला नाही तर त्यांची देशभरात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
सरकारने मुद्रा स्कीमअंतर्गत कर्ज घेणाऱ्या लोकांची सक्सेस स्टोरी शेअर केली आहे. त्या आधारे आम्ही तारकेश्वरी यांची सक्सेस स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच हे पण सांगणार आहोत की, तुम्ही पण या योजनेचा कसा फायदा घेऊ शकतात.
काय करतात तारकेश्वरी ?
तारकेश्वरी, हैदराबादमध्ये आपला एक बुटीक चालवतात, ज्याचे नाव तारा'स स्टाइलिंग बुटीक आहे. त्या ड्रेस मटेरिअलच्या डिझाइन आणि साडीचा व्यवसाय करतात. त्यांचे बहुतेक क्लायंट हे एनआरआय आहेत. त्यांच्याकडे 5 लेबर आहेत, जे स्टिचिंग वर्क, मॅगेम वर्क, डाईंग इत्यादी काम करतात. चांगल्या डिझाइनमुळे त्यांच्या प्रोडक्टला चांगली डिमांड आहे.
कर्जाची गरज का भासली ?
तारकेश्वरी यांच्या डिझाइनची मागणी वाढल्यामुळे त्यांना बल्क ऑर्डर येणे सुरू झाले, पण जागेची कमतरता आणि वर्किंग कॅपिटल नसल्यामुळे त्यांना ती आॉर्डर पुर्ण करता आली नाही. तेव्हा त्यांना मुद्रा स्किमविषयी कळाले. त्यानंतर त्यांनी आंध्रा बँकेतून कर्ज घेतले.
पुढे वाचा- मिळाले पाच लाखांचे कर्ज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.