Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | business of removing miscarriage in Beed district

बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढून टाकण्याचा गोरखधंदा; जिल्ह्यातील रुग्णालये रडारवर

प्रतिनिधी | Update - Apr 12, 2019, 10:14 AM IST

बीड, अंबाजोगाई, परळीच्या रुग्णालयांचा समावेश

  • business of removing  miscarriage in Beed district

    बीड - जिल्ह्यात कमी वयाच्या महिलांची गर्भपिशवी काढून टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर आता राज्याचा आरोग्य विभाग कामाला लागला असून पाचसदस्यीय समितीकडून याची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. सुमारे २०० रुग्णालयांत तीन वर्षांच्या रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर टॉप टेन रुग्णालयांची यादी तयार केली. या रुग्णालयांनी दीड हजार महिलांच्या गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.


    बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. साधारणत: चाळिशीनंतर कर्करोग अथवा इतर कारणांमुळे गर्भपिशवी काढण्यात येते. मात्र, जिल्ह्यात कमी वयाच्या हजारो महिलांच्या गर्भ पिशव्या काढून टाकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकारांची चौकशी सुरू केली आहे.

    बीड, अंबाजोगाई, परळीच्या रुग्णालयांचा समावेश
    टॉप टेनमध्ये बीड शहरातील ७, अंबाजोगाई येथील दोन, तर परळी येथील एका रुग्णालयाचा समावेश आहे. या रुग्णालयांची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

Trending