आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियात अपहरण झालेल्या डाेंबिवलीतील बंधूंची सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- व्यवसायानिमित्त मलेशियात गेलेल्या डाेंबिवलीतील वैद्य बंधूंचे एक काेटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात अाले हाेते. या प्रकारामुळे चिंतित झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी तातडीने स्थानिक पाेलिस अाणि भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने चक्र फिरल्यानंतर मलेशिया पाेलिसांनी या दाेन्ही भावांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. सध्या मलेशियामध्ये सुखरूप असून ते  लवकरच भारतात येणार अाहे. ते अाल्यावरच अपहरण प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट हाेऊ शकेल, असे ठाणे पाेलिसांनी म्हटले अाहे.

  
डाेंबिवलीमध्ये राहणारे राेहन प्रकाश वैद्य (३६) अाणि काैस्तुभ प्रकाश वैद्य (३१) यांचा मांस निर्यातीचा व्यवसाय असून त्यांची राॅक फ्राेझन फूड्स कंपनी अाहे. या व्यवसायासाठी दाेन्ही भावांचे  मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम या देशांमध्ये नेहमी जाणे-येणे असते. मलेशियातल्या मिस ली फ्राेझन या कंपनीबराेबर प्राथमिक चर्चा झाल्यावर व्यवसायाची उर्वरित बाेलणी करण्यासाठी दाेन्ही भाऊ एक अाॅगस्ट राेजी मलेशियात दाखल झाले.  दाेन अाॅगस्टला त्यांची संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींबराेबर चर्चा झाली. त्याच दिवशी रात्री अापले अपहरण झाल्याचा फाेन वैद्य बंधूंपैकी एकाने अापले वडील प्रकाश वैद्य यांना डाेंबिवलीत केला. तसेच अपहरणकर्त्यांनी खंडणीपाेटी एक काेटी रुपयांची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. 


या प्रकारानंतर त्यांचे काका राजीव वैद्य यांनी डाेंबिवलीतील रामनगर पाेलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार नाेंदवली. तसेच त्यांनी भारतीय दूतावासाशी तातडीने संपर्क साधून या प्रकरणाची मलेशिया पाेलिसांकडे तक्रार नाेंदवण्याची विनंती केली. राजीव वैद्य यांच्या तक्रारीवरून रामनगर पाेलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विराेधात खंडणीसाठी अपहरण अाणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता.  


परराष्ट्र मंत्रालयाने हलवली सूत्रे  
ठाणे गुन्हा शाखेचे पाेलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले की, ‘वैद्य बंधूंच्या सुटकेसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने मलेशिया दूतावासाच्या माध्यमातून पाठपुरावा केला. मलेशिया पाेलिसांनी तातडीने हालचाली करत या दाेन्ही भावांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. याबाबत मलेशिया पाेलिसांनी मंगळवारी दूरध्वनी करून अाम्हाला याबाबत माहितीही दिली. सध्या वैद्य बंधू मलेशियामध्ये सुखरूप असून ते भारतात परतल्यावरच या अपहरणाबाबतचा उलगडा हाेऊ शकेल,’ असे पोलिसांनी या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...