आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे अपहरण, अवघ्या काही तासातच पोलिसांनी केली सुटका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- नगरमधील उद्योजक करीमभाई हुंडेकरी यांचे आज(18 नोव्हेंबर) सकाळी राहत्या घरा जवळून अपहरण करण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्याप्रमाणे चार ते पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत हुंडेकरी यांना एका गाडीत बसवले. माहिती मिळताच पोलिसांकडून हुंडेकरी यांचा शोध सुरू झाला आहे. त्यानंतर अवघ्या काही तासातच हुंडेकरी यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार करीमभाई हुंडेकरी आज सकाळी आपल्या घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने बंदुकीचा धाक दाखवत हुंडेकरी यांना गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हुंडेकरी यांनी स्वतःची सुटका करुन घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. असे प्रत्यक्षदर्शी महिलांनी पोलिसांना सांगितले. अपहरणकर्त्यांच्या तोंडाला मास्क बांधले असल्याने महिला त्यांचे चेहरे ओळखू शकल्या नाहीत. दरम्यान, पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत हुंडेकरी यांची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...