आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CAF जवान मित्राला म्हणाला - 'एक तर मी आत्महत्या करतो नाहीतर त्याचा तरी जीव घेतो'...तो माझे ऐकतच नाहीये; रायफल घेऊन शोरूममध्ये गेला आणि केबिनमधील बिझनेसमनवर झाडल्या गोळ्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर (छत्तीसगड) -  मंगळवारी छत्तीसगड आर्म फोर्स (सीएएफ)चा जवान मनोज सेनने कार व्यापारी संजय अग्रवाल यांची गोळी घालून हत्या केली. शोरूममधील सीसीटीव्ही मध्ये ही घटन कैद झाली. या घटनेनंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहे. 

 

जुनी गाडी ठरली मृत्यूचे कारण

पोलिसांच्या मते, राजेंद्र नगर भागातील पचगेडी नाका येथे संजय अग्रवाल यांचे श्री साई मोटर्स नावाचे कारचे शोरूम आहे. ते सेकंड हँड वाहनांचा व्यवसाय करत होते. पोलिस दलात असलेल्या मनोज सेनने संजय यांच्या शोरूममधून 4 मार्च रोजी 3.70 लाख रुपयांत एका सेकंड हँड कारचा सौदा ठरवला होता. ठरल्याप्रमाणे सेनने संजयला 3 लाख रुपये दिले होते. पण कार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कारमध्ये खराबी आली. कारच्या टायर आणि पिकअपमध्ये अडचण होती. यानंतर सेनने संजयला कारची दुरुस्ती करण्यास सांगितले आणि कार संजयकडेच ठेवली. मनोज वेळोवेळी संजयकडे कारची दुरुस्ती करण्यास सांगत होता. पण संजयने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रागाच्या भरात मनोजने संजयवर गोळ्या झाडल्या.


जवान मित्राला म्हणाला होता - स्वतः मरेन किंवा त्याला मारेल 
होळी दरम्यान गाडी घेण्यासाठी मनोज शोरूमला पोहोचला पण कार जैसे थे अवस्थेत उभी होती. सण असल्यामुळे कारची दुरुस्ती करता आली नसल्याचे संजयने मनोजला सांगितले. यामुळे दोघांमध्ये वादविवाद झाला. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. या भांडणानंतर आरोपी आपल्या मित्राला सांगत म्हणाला की, 'संजयने मला खूप त्रास दिला आहे. आता एक तर मी आत्महत्या करतो नाहीतर त्याचा तरी जीव घेतो' नंतर मनोज शोरूममध्ये गेला आणि केबिनच्या बाहेरून राफलने संजयवर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी संजयला रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

बातम्या आणखी आहेत...