आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापाने 11 वर्षाच्या मुलाला फॉर्च्युनरमध्ये मारली गोळी आणि स्वतःही केली आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर (राजस्थान) - जिल्ह्यातील फेफाना गावामध्ये मेहला कुटुंबात घरजावई बनून राहत असलेल्या एका व्यापाऱ्याने व्यवसायात तोटा झाल्यामुळे डीप्रेशनमध्ये येऊन गुरुवारी दुपारी पहिले आपल्या 11 वर्षाच्या मुलावर गोळी झाडून त्याची हत्या आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. हे संपूर्ण प्रकरण हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील गाव धिंगतानियांजवळ फॉर्च्युनर गाडीच्या काचा बंद करून करण्यात आले. गोळी मुलाच्या डोकातून आरपार जाऊन गाडीच्या काचामध्ये घुसली आणि यामुळे काच फुटला. त्यानंतर गावकऱ्यांना याविषयी समजले. या घटनेची माहिती सदर पोलीस स्टेशनला कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी मुलाला मुलाला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले होते. मुलाच्या वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला होता. संध्याकाळी उशिरा डॉक्टरांनी मुलालाही मृत घोषित केले.


मुलगा आणि स्वतःच्या डोक्यात मारली गोळी 
सिरसा सदर पोलीस स्टेशन प्रभारी जगदीश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रमने पहिले मुलाला गोळी मारली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळी डोक्यातून आरपार निघून काचेला लागली. दोन गोळ्या फायर करण्यात आल्या आहेत. गाडीमध्ये पाच गोळ्या आढळून आल्या आहेत. रिव्हॉल्व्हरचे लायसन आहे. विक्रमने असे कशामुळे केले, याविषयी कुटुंबातील सदस्यांची चौकशी केल्यानंतर समजू शकेल. सध्या शव हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. मूत मुलगा देवचे काका देवीलाल यांच्या तक्रारीनुसार मृतक विक्रमविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


असे घडले संपूर्ण प्रकरण 
- मूळचा हिसार जिल्ह्यातील कालीरावण गावातील राहणारा 40 वर्षीय विक्रम सिंह मागील 9-10 वर्षांपासून उदयपूर येथील फेफाना गावात सासरे महावीर मेहला यांच्याकडे पत्नी आणि मुलासोबत राहत होता. गावकऱ्यांच्या नजरेत विक्रम जवळपासच्या गाव आणि शहरात धान्याची खरेदी-विक्री करत होता. गावकरी त्याला व्यापारी आणि प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारा समजत होते. गुरुवारी सकाळी तो आपल्या 11 वर्षाचा मुलगा देवला शाळेत सोडण्यासाठी फॉर्च्युनर कारमधून सिरसा येथे गेले होता. देव सहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता.


- शाळेतील पदाधिकारी कमल बन्सलने सांगितले की, देव मागील चार-पाच दिवसांपासून शाळेत आला नव्हता. गुरुवारी त्याचे वडील विक्रम त्याला शाळेत सोडून गेले होते. देव नेहमी शाळेच्या बसनेच येतो परंतु त्यादिवशी तो वडिलांसोबत कारमधून आला होता. सकाळी 11 वाजता विक्रम पुन्हा शाळेत आला. देवची तब्येत ठीक राहत नसल्यामुळे त्याला डॉक्टरांकडे घेऊन जायचे आहे, असे सांगून मुलाला घेऊन गेला. त्यानंतर दुपारी  धिंगतानियां गावाचे सरपंच यांनी फोन करून ही घटना घडल्याचे सांगितले. त्यांनी देवच्या गळ्यातील आयडी कार्डवरून शाळेच्या नंबरवर फोन करून आम्हला ही माहिती दिली.


- प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दुपारी तीन वाजता एक फॉर्च्युनर गाडी नेजियाखेडाकडून आली होती. त्यानंतर गावाजवळ थांबली. लोकांनी सांगितले, सुरुवातीला गाडीच्या काचा उघडण्यात आल्या. चालकाने पाणी पिले. त्यानंतर गाडी मागे-पुढे केली. गाडीच्या काचा बंद करण्यात आल्या. काचा काळ्या रंगाच्या होत्या. थोड्यावेळाने गाडीजवळून जाणाऱ्या गाडीचा काच फुटलेला दिसला. त्यांनी गाडीमध्ये डोकावून पाहिले तर, हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. विक्रमला एक मुलगीही आहे.


3 महिन्यापूर्वी गावात चालवली होती रिव्हॉल्वर, बुकी चालवण्याच्या आरोपातही झाली होती अटक 
गावकऱ्यांच्या नजरेत भलेही विक्रम एक व्यापारी होता परंतु पोलीस रेकॉर्डनुसार त्याच्यावर क्रिकेट बुकी चालवण्याचाही गुन्हा होता. विक्रम दबंग स्वभावाचा असल्याचे सांगण्यात येते. स्वतःजवळ नेहमी रिव्हॉल्वर ठेवायचा. 15 दिवसांपूर्वीच लाखो रुपयांच्या देण्या-घेण्यावरून गावात पंचायत भरली होती. विक्रमला कोणाकडून तरी पैसे घ्यायचे होते. अनेक लोकांची मध्यस्थिही केली होती. व्यवसायात तोटा होत असल्यामुळे काही दिवसांपासून तो तणावात होता. फेफाना पोलीस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र यांच्यानुसार 3 महिन्यांपूर्वी विक्रमविरुद्ध गावातील एका व्यक्तीने देण्या-घेण्याच्या व्यवहारातून हवेत फायर केल्याचा आरोप केला होता. परंतु नंतर दोघांनी आपापसात प्रकरण मिटवून घेतले. अशाचप्रकारे विक्रम स्वतःचे गाव कालीरावणमध्येसुद्धा दहशत करत होता.

बातम्या आणखी आहेत...