आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचे मन वळवण्यासाठी वडिलांनी घेऊन दिली 1 लाखाची बाइक; जॅग्वार, ऑडीसह मर्सेडीझचे दिले अमीष, तरीही बदलला नाही निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - दीक्षा नगरी नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये वर्षभरात 100 हून अधिक लोकांनी संन्यास घेण्याचा मार्ग निवडला आहे. त्यात सोमवारी आणखी एकाची भर पडली. गुजरातचे प्रसिद्ध कापड व्यापारी भरत व्होरा यांचा मुलगा यश (20) आणि मुलगी आयुषी (22) या दोघांनी दीक्षाच्या पथावर जाण्याचा प्रण घेतला आहे. भरत व्होरा मूळचे बनासकांठाचे आहेत. संसाराची मोह-माया त्यागून व्होरा परिवारच्या मुला-मुलींनी हा मार्ग निवडला आहे. दीक्षा घेतल्यानंतर मुमुक्षू आयुषी आणि मुमुक्षू यश इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूसह गाडीचा देखील वापर करू शकणार नाहीत. त्यांचा दीक्षा समारंभ 9 डिसेंबर रोजी अडाजण येथील रिव्हर फ्रंटला होणार आहे. तत्पूर्वी 7 डिसेंबर रोजी त्यांची शोभा यात्रा काढली जाणार आहे. 


वडिलांची इच्छा नव्हती, मुलाला दिली इतकी प्रलोभणे...
यशच्या निर्णयावर वडील खुश नव्हते. त्यांनी आपल्या मुलाचे मन परिवर्तन करण्यासाठी त्याला एक लाखाची बाइक घेऊन दिली. वेळोवेळी त्याला जॅग्वार, ऑडी, मर्सेडीज अशा महागड्या कारसह लाखोंचे फोन घेऊन देण्याचे अमीष दिले. आपल्या मुलाने कुटुंबाचा वडिलोपार्जित व्यापार सांभाळावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी आपल्या मुलाला संपूर्ण बिझनेस नावे करणार असेही सांगितले. परंतु, यश आपल्या निर्णयावर ठाम होता. त्याने आपल्या वडिलांचे सर्वच प्रस्ताव नकारले. त्याने आपल्या मनातील गोष्ट आईला सांगितली. आईनेच कुटुंबातील सर्वांना मुलाच्या निर्णयासाठी होकार मिळवून दिला. 


असा घेतला आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय
मुमुक्षू यश आणि मुमुक्षू आयुषी यांच्या वडिलांनी सांगितले, की त्यांच्या गावात प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीने दीक्षा घेतलेली आहे. परंतु, त्यांच्या (व्होरा) कुटुंबातून कुणीही दीक्षा घेतलेली नव्हती. त्यामुळे, मी मुलगी आयुषी हिला दीक्षा संदर्भात माहिती दिली. दहावीची परीक्षा झाल्यानंतर आयुषी कुटुंबियांसोबत आचार्य यशोवर्मसूरी महाराज यांच्या प्रवचनात गेली होती. त्याचवेळी तिच्या मनात दीक्षा घेण्याचा विचार आला. बारावीला आयुषीने 75 टक्के मार्क मिळवले होते. यानंतर आयुषीने आचार्य यशोवर्मसूरी यांच्या सानिध्यात 4 वर्षे महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक ठिकाणी विहार केला आणि शेवटी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. यशने सुद्धा आपली बारावीची परीक्षा संपल्यानंतर दोन वर्षे विहार केला. यानंतरच दीक्षेचा मार्ग निवडला. आयुषी गतवर्षी दीक्षा घेणार होती. परंतु, या वर्षी हे दोघे एकत्रित दीक्षा घेणार आहेत.


काय म्हणाला मुलगा?
मुमुक्षू यशने सांगितले, की पैसे, गाडी किंवा घर एकही गोष्ट माणसाच्या अंतिम समयी सोबत जाणार नाही. आपले कर्मच आपले पुढील जन्म निश्चित करत असतात. ज्याने संसारातील मोह-माया समजून घेतली. तोच संयमाच्या मार्गावर चालू शकतो. या क्षणिक सुखांनी आपण आयुष्यभर खुश राहूच शकत नाही. मुमुक्षू आयुषीने सांगितल्याप्रमाणे, विहार करताना तिने भौतिक सुख सुविधांचा त्याग करून संयमाचा मार्ग अवलंबला होता. त्याचवेळी नेहमीसाठी या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...