आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Buta Singh News In Marathi, Buta Left The Congress

बूटासिंग सपाच्या मांडवात, सतपाल महाराजांचा कॉंग्रेसला रामराम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसला दोन मोठे धक्के बसले आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते बुटासिंग आणि सतपाल महाराज यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बुटासिंग समाजवादी पक्षात गेले आहेत तर सतपाल महाराज भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे.
मुलासाठी तिकीट हवे होते सतपाल यांना
कॉंग्रेसचे खासदार सतपाल महाराज यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सतपाल भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांना मुलासाठी तिकीट हवे होते, असे सूत्रांकडून समजते. परंतु, कॉंग्रेसने त्यांच्या मुलाला तिकीट देण्यास आधीच नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतपाल नाराज आहेत.
बूटासिंग जालौर येथून निवडणूक लढविणार
बूटासिंग राजस्थानमधील जालौर मतदारसंघातून निवडणूक रिंगणार उतरणार आहेत. कॉंग्रेसवर नाराज असल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बूटासिंग भाजपमध्ये जाण्यास इच्छुक होते. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता. परंतु, त्यांना समाधानकारक प्रतिक्रिया मिळाली नाही. बूटासिंग यांनी त्यांच्या मुलीसाठी राजस्थानमधील गंगानगर येथून तिकीट मागितले होते. यासाठी त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांची भेटही घेतली होती.
कोण आहेत बूटासिंग
बूटासिंग माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळापासून कॉंग्रेससाठी काम करीत आहेत. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे ते विश्वासू सहकारी होते. त्यांनी कॉंग्रेसचे महासचिवपदही भूषविले आहे. ते केंद्रीय गृहमंत्री आणि कृषिमंत्रीही होते. 2004-2006 या कालावधीत ते बिहारचे राज्यपाल होते. यावेळी बिहारची विधानसभा विसर्जित करण्यावरून ते वादात अडकले होते. सुमारे पंचवीस वर्षांपासून ते कॉंग्रेसशी निगडीत होते.