Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | buttermilk-will-reduce-your-weight

ताक प्यायल्याने लठ्ठपणा होतो कमी

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 03:25 PM IST

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ग्लास ताक पिल्याने लठ्ठपणा कमी करता येतो.

 • buttermilk-will-reduce-your-weight

  पैसा, ज्ञान सगळं काही मिळून सुद्धा काही व्यक्तींना आय़ुष्यात शारीरिक व्यंगामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. लठ्ठपणामुळेही काही व्यक्तींना चारचौघांत वावरताना संकोचायला होते. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतानाही लठ्ठ व्यक्तींपुढे अनेक अडचणी येतात.

  एखाद्या अवघड गोष्टीला सोपं करता करता प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनातील अवघड गोष्टींचे उत्तर मिळतेच. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण ग्लास ताक पिल्याने लठ्ठपणा कमी करता येतो.

  - प्रत्येक दिवशी सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घरातच तयार करण्यात आलेले एक ग्लास ताक प्यावे. त्यामध्ये स्वादानुसार थोडेसे काळे मीठ आणि हिंग-जीरा पावडर घालण्यास काहीच हरकत नाही.

  - प्रत्येक दिवशी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात एक ते दोन चमचे त्रिफळा चूर्ण घालून ते प्यावे.

  - एखाद्या जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी योग आणि प्राणायाम करावे.

Trending