आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Buxar Jail Gets Rope Orders For Hanging, Nirbhaya Rape Culprits May Hanged On 16 December News And Updates

16 डिसेंबरला फासावर लटकणार निर्भयाचे दोषी! तुरुंगाला 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहारच्या या तुरुंगात बनवले जात आहेत दोरखंड
  • अफझल गुरूच्या फाशीसाठी दोरखंड येथेच बनवले

बक्सर - दिल्लीच्या निर्भया प्रकरणातील नराधमांना कधीही फासावर लटकवले जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, त्या सर्वांना येत्या एका आठवड्यात फाशी दिली जाऊ शकते. बिहारच्या बक्सर तुरुंग प्रशासनाला याच आठवड्याच्या शेवटी 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बिहारचे बक्सर तुरुंग फाशीचे दोरखंड तयार करण्यात सर्वात एक्सपर्ट जेल मानली जाते. फास बनवण्याचे निर्देश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आले होते. परंतु, ही मागणी कुणाला फाशी देण्यासाठी आली याची अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर अमानवीय अत्याचार करण्यात आले होते. तर फाशीचे दोरखंड 14 डिसेंबर पर्यंत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, निर्भयाच्या दोषींना 16 डिसेंबर रोजीच फाशी दिली जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

येथेच अफझल गुरूच्या फाशीसाठी दोरखंड


बक्सर तुरुंग अधीक्षक विजय कुमार अरोरा यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की त्यांना "14 डिसेंबर पर्यंत 10 दोरखंड तयार ठेवण्याचे निर्देश दिले. आम्हाला ते कशासाठी बनवले जातील हे सांगण्यात आलेले नाही." विशेष म्हणजे, संसदेवर हल्ल्याचा आरोपी अफजल गुरूला जेव्हा फाशी देण्यात आली तो दोरखंड याच ठिकाणी तयार करण्यात आला होता. 2016-17 मध्ये पतियाळा तुरुंगाकडून हे आदेश मिळाले होते. त्यावेळी सुद्धा ते कुणासाठी मागवण्यात आले याची माहिती देण्यात आली नव्हती.

असे तयार होतात दोरखंड


तुरुंग अधीक्षकांनी सांगितले, की बक्सर जेलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दोरखंड तयार केले जात आहेत. फाशी देण्यासाठी एक दोरखंड 7200 धाग्यांपासून बनवले जाते. हे तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. त्यावर 5 ते 6 लोकांना काम करावे लागते. या कामासाठी कैद्यांनाच जबाबदारी दिली जाते. दोरखंड तयार करण्यासाठी हातासह थोडाफार मशीनचा देखील वापर होतो. गेल्यावेळी जेव्हा दोरखंड तयार करण्यात आले तेव्हा त्यांची प्रत्येकी किंमत 1725 रुपये होती. आता मात्र, त्या दोरखंडांना लावल्या जाणाऱ्या पितळाच्या बुशची आणि इतर किमती वाढल्याने महाग होऊ शकतात अशी माहिती अधीक्षकांनी दिली आहे.


16 डिसेंबर 2012 च्या काळरात्री निर्भया आपल्या मित्रासोबत घरी जात होती. त्याचवेळी बसमध्ये असलेल्या 6 नराधमांनी मित्राला मारहाण करून तिच्यावर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. अत्याचार इतका पाशवी होता की तिच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. क्रूरकर्मांनी तिच्या गुप्तांगांमध्ये लोखंडी सळ्या खोपल्या होत्या. काही दिवस तिच्यावर उपचार देखील झाले. परंतु, एकूणच तिची अवस्था पाहता तिला वाचवणे अशक्य होते. सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झाला. यातील एका आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली. दुसरा अल्पवीय असल्याने त्याची तीन वर्षांनंतर सुटका झाली. तर चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने कनिष्ठ न्यायालय आणि दिल्ली हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला. यातील 3 दोषींनी सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु, ती फेटाळून लावण्यात आली. यापूर्वी दिल्ली सरकारने सुद्धा दोषींचा दयेचा अर्ज नकारला. आता राष्ट्रपतींचा निर्णय समोर येताच नराधमांच्या फाशीचा मार्ग मोकळा होणार आहे.


(देश, विदेश आणि मनोरंजनासह आपल्या शहरातील अपडेट बातम्यांसाठी इंस्टॉल करा Divya Marathi App)

बातम्या आणखी आहेत...