Home | Business | Business Special | Buy 500 gram chicken at just rupees 1

फक्त 1 रुपयात 500 ग्रॅम चिकन देत आहे ही कंपनी; पाहा काय आहे ऑफर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 04:53 PM IST

आता ग्राहकांना मिळेल फ्रेश आणि केमिकल रहित चिकन.

 • Buy 500 gram chicken at just rupees 1

  नवी दिल्ली- सध्या अनेक लोकांची पसंत नॉनव्हेज पदार्थांकडे वळली आहे. बरेचजण रोजच नॉनव्हेज खातात. पंरतू काही दिवसांपासून नॉनव्हेजच्या भाववाढीमुळे लोकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच नॉनव्हेज शॉपमधून आणल्यानंतर त्याला स्वच्छ करण्याचा मोठा त्रास असतो. परंतू आता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात सध्या चिकनचा भाव 200 रुपये प्रतिकिलो तर मटनचा भाव 500 प्रतिकिलो आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा वेबसाइटविषयी सांगणार आहोत जिथून तुम्ही फक्त 1 रुपयात चिकन खरेदी करु शकतात.

  ही कंपनी देत आहे फक्त 1 रुपयात चिकन
  'फ्रेश टू होम' असे या वेबसाइटचे नाव असून या वेबसाइटवर 1 रुपयात 500 ग्रॅम चिकन विकण्यात येत आहे. त्यासोबतच तुम्ही प्ले स्टोर आणि अॅप स्टोरमधून या वेबसाइटचे अॅप्लीकेशन डाउनलोड करुन ऑनलाइन नॉनव्हेज ऑर्डर करु शकतात.

  पुढील स्लाइडवर वाचा- काय आहे ऑफर

 • Buy 500 gram chicken at just rupees 1

  काय आहे ऑफर
  > 1 रुपयात 500 ग्रॅम चिकन खरेदी करण्यासाठी तुम्हाला साइटवर रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतरच तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. जर तुम्हाला 1 रुपयात चिकन खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 499 रुपयांपर्यंत शॉपिंग करावी लागेल त्यानंतर 'JAN19' असा प्रोमो कोड अप्लाय करुन तुम्ही 1 रुपयांत चिकन खरेदी करु शकतात.

   

  पुढील स्लाइडवर वाचा- आणखी कोणत्या गोष्टी मिळतात फ्रेश टू होममध्ये

   

 • Buy 500 gram chicken at just rupees 1

  फ्रेश टू होममध्ये मिळतात या गोष्टी
  > तुम्ही 'फ्रेश टू होम' या वेबसाइटवर चिकनसोबतच मटन, फिश, मॅरिनेट केलेले नॉनव्हेज, सी-फूड असे सर्वप्रकारचे नॉनव्हेज फूड ऑर्डर करु शकतात. खास गोष्ट म्हणजे तुम्हाला 799 रुपयांच्या नॉनव्हेज खरेदीवर फ्री शिपिंगची सुविधा मिळते. सध्या दिल्लीत फ्रेश टू होमचे 2 आउटलेट असून तुम्हाला नॉनव्हेज खरेदी करायचे असल्यास एक दिवसआधी ऑर्डर करावी लागते. त्याची डिलेव्हरी एक दिवसानंतर सकाळी 7 ते 11.30 च्या दरम्यान मिळते. परंतू तुम्हाला लवकर मागवायचे असल्याच 12 च्या आधी ऑर्डर करावी लागते. त्यानंतर तुम्हाला रात्री 8 वाजता डिलेव्हरी मिळेल.  

Trending