Home | Business | Auto | Buy Hyundai new car get benefits up to 2 lakh rupees in Hyundai Carnival

हुंदाईचा हॅचबॅक कार्निव्हल : खरेदी करा हुंदाईची नवीन कार आणि मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 03:14 PM IST

हुंदाई हॅचबॅक कार्निव्हल 3 जून ते 30 जून दरम्यान सुरू राहणार

 • Buy Hyundai new car get benefits up to 2 lakh rupees in Hyundai Carnival

  नवी दिल्ली - हुंदाईने हॅचबॅक कार्निवल सुरू केला आहे. या कार्निव्हलमध्ये कंपनीच्या निवडक गाड्यांवर 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ देण्यात येत आहे. सोबतच 3 ग्राम सोन्याचे नाणे, एक्सचेंज बोनस देखील देण्यात येणार आहे. हा कार्निव्हल 3 जूनपासून सुरू झाला असून 30 जूनपर्यंत राहणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हुंदाईच्या वेबसाइटवर भेट द्यावी लागले.

  अॅक्सेंट
  हुंदाईच्या अॅक्सेंटची दिल्ली एक्स शोरूम किंमत 5.72 लाख ते 8.77 लाख रूपये दरम्यान आहे. हॅचबॅक कार्निव्हलमधये या गाडीवर 95 हजार रूपयांपर्यंतचा लाभ देण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये कार उपलब्ध आहे.


  अॅलीट i20
  या कारवर ऑफरअंतर्गत 25 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या या कारची एक्स शोरूम किंमत 5.5 ते 9.32 लाख रूपयांपर्यंत आहे.

  सँट्रो
  हुंदाईच्या या कारवर 35 हजार रूपयांचा लाभ देण्यात येत आहे. सँट्रोची दिल्ली एक्स शोरूम किंमत 3.90 लाख ते 5.65 लाख रूपये आहे.


  वेरना
  हुंदाईच्या वेरना कारची एक्स शोरूम दिल्ली किंमत 8.08 लाख ते 14 लाख रूपये आहे. हॅचबॅक कार्निव्हलमधये या कारवर 40 हजार रुपयांचा लाभ देण्यात येत आहे. वेरना पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.


  ग्रँड i10
  कार्निव्हलमध्ये ग्रँड i10 वर 95 हजार रुपयांचा फायदा देण्यात येत आहे. ग्रँड i10 पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून याची एक्स शोरूम दिल्ली किंमत 4.97 लाख ते 7.62 लाख रूपयांपर्यंत आहे.


  अॅलांट्रा
  ही कार देखील पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंटमध्ये मिळते. याची दिल्ली एक्स शोरूम किंमत 13.8 लाख ते 20 लाख रूपये दरम्यान आहे. या कारवर हॅचबॅक कार्निव्हल अंतर्गत 2 लाख रूपयांचा लाभ देण्यात येत आहे. यामध्ये सुवर्ण नाण्यासह एक्सचेंज बोनसचा समाविष्ट आहे.


  टकसन
  हुंदाईच्या टकसनची दिल्ली एक्स शोरूम किंमत 18.74 लाख ते 27 लाख रूपये आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.


  i20 अॅक्टिव
  ऑफरमध्ये i20 अॅक्टीव्हवर 25 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळत आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि याची दिल्ली शोरूम किंमत 7.71 लाख ते 9.91 लाख रूपये आहे.

Trending