आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Buying A Ticket 6 Times, The First Lottery In The Dream, The Jackpot Of 23 Million The Next Day

6 वेळा तिकीट खरेदी केले, स्वप्नात पहिले की लॉटरी लागली, दुसऱ्याच दिवशी 23 कोटींचे जॅकपॉट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगलोर : कर्नाटकच्या मंगलोरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षांच्या मोहम्मद फैयाजला अबुधाबीमध्ये 12 मिलियन दिरहम (सुमारे 23 कोटी रुपये) जॅकपॉट लागला आहे. याबद्दल फैयाजने सांगितले की, यापूर्वीही 6 वेळा त्याने लॉटरीची तिकिटे खरेदी केलेली आहेत. अखेरचे 30 सप्टेंबरला अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्टवर बिग तिकीट लॉटरी तिकीट खरेदी केले होते.  

फैयाज यांच्यानुसार, एक एक दिवसागोदरच त्याने स्वप्न पहिले होते की, त्याला जॅकपॉट लगला आहे आणि दुसऱ्याच दिवशी अबुधाबीहून फोन आला. बिग तिकिटाच्या आयोजकांनी सांगितले की, जॅकपॉट जिंकल्याची माहिती देण्यासाठी फैयाजला चारवेळा फोन केला गेला, पण त्याने फोन घेतला नाही. पाचव्या वेळी फैयाजने फोन उचलला.  

रकमेचा वापर घर बनवण्यासाठी करणार... 
फैयाजने सांगितले की, तो सध्या मुंबईमध्ये अकाउंटंटची नोकरी करतो. त्याच्या कुटुंबात एक बहीण एक भाऊ आहे. किडनीच्या आजारामुळे त्याच्या माता पित्याचे निधन झाले आहे. या रकमेचा वापर तो आपल्या बहीण भावांचे शिक्षण आणि घर बनवण्यासाठी करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...