आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनऊमध्ये नवजात मुलीला पाजला चहा, फुफ्फुसात संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- नवजात बाळांना सहा महिन्यापर्यंत आईचे दुध पाजावे डॉक्टर सांगत असतात. अनेक ठिकाणी याबद्दल जनजागृती केली जाते. पण लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नवजात मुलीला चहा पाजल्याने मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील फरीदाबादमध्ये घडली. चहा पाजल्याने तिला फुप्फुसात संसर्ग झाला, त्यानंतर तिला रुग्णालायत दाखल करण्यात आले होते पण डॉक्टरांनी बाळाची परिस्थिती पाहूनर दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले, पण कुटुंबीयांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल न केल्याने तिचा मृत्यू झाला.


डॉक्टरांच्या मते, चिमुकलीला कुटुंबीयांनी चहा, पाणी, दह्यासारखे पदार्थ भरवले होते. त्यामुळे तिच्या फुप्फुसात इन्फेक्शन झाले होते. सपना नावाच्या महिलेने मुलीला जन्म दिला होता. पण सपनाने लगेचच मुलीला चहा, पाणी, दह्यासारखे पदार्थ भरवले. त्यामुळे चिमुकलीच्या फुप्फुसात संसर्ग झाला. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिच्यावर 24 तास अतिदक्षता विभागात उपचार झाले, पण तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

बातम्या आणखी आहेत...