आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • By Saying I Will Supply 10 Thousand Metric Tonne Of Wheat, A Person Fraud One For Sixty Lac Rupees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 हजार मे. टन गहू पुरवतो सांगून आष्टीत एकाला 60 लाखांचा गंडा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी : गहू पुरवठा करण्याच्या नावाखाली आष्टीतील इंडस्ट्रीच्या मालकास ६० लाख रूपयांचा गंडा घातल्या प्रकरणी आष्टी न्यायालयाने शुक्रवारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यांनतर आष्टी पोलिसांत तिघांवर गुन्हे नोंद झाले आहेत. व्यापारी विजय कृष्णकांत यादव (रा. इंदूर, म.प्र.), दलाल विठ्ठल रामराव सोनवणे (रा. कडा) व तेजल मुनशी (रा. गोरेगाव , मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत .

आष्टी शहरात २०१३ पासून ग्लोबल अग्रो इंडस्ट्रीजमध्ये रवा, मैदा, चक्की आटा, तंदुरी आटा, गुरांसाठी भुसा, पेंड तयार करून तो माल पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथे विक्री केला जातो. या इंडस्ट्रीजचे ईश्वर शिंगटे यांच्यासह अन्य दोन सहकारी व्यवसायात पार्टनर आहेत. १८ जानेवारी २०१८ मध्ये मध्य प्रदेशतील व्यापारी विजय यादव (रा. इंदूर) व दलाल विठ्ठल सोनवणे (रा. कडा ता. आष्टी) या दोघांनी इंडस्ट्रीला भेट देऊन गहू पुरवठ्याचा करार केला. 


कराराप्रमाणे शिंगटेंनी सुरुवातीला १० हजार मेट्रिक टन गव्हाची मागणी केली. मात्र आमच्याकडून ऐेवढ्या प्रमाणात गव्हाचा पुरवठा होणार नाही असे यादव याने त्यांना सांगितले. शेवटी पाच हजार मेट्रिक गव्हाचा आम्ही पुरवठा करू असे दोघांनी लेखी स्वरूपात शिंगटंेशी संमतीपत्र भरून करार केला. यानंतर शिंगटेंंनी यादव यांना १५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठवल्यानंतर यादव व दलाल साेनवने या दोघांनी मालाचे ट्रक इंदूरहून निघाले असून तुम्हाला माल दोन दिवसांत मिळेल, अशी थाप मारली. शिंगटंेंना ट्रक व चालकाचा बनावट मोबाइल नंबर दिला. नंतर ट्रक धुळ्यात फेल झाला आहे. उद्या ट्रक पोहचेल असे शिंगटे यांना सांगितले. त्यानंतर तुमचा ट्रक गहू घेऊन नगर येथे आल्याचे सांगितले. शहानिशेसाठी शिंगटे हे विठ्ठल सोनवनेंना बरोबर घेऊन नगरला गेले, तेव्हा मालाचा ट्रक दिसला नाही. शिवाय दिलेला मोबाइलही बंद होता. नंतर शिंगटेंनी यादवला फोन केला तेव्हा तुमच्या मालाचा ट्रक फेल झाला असून आज दुसरा ट्रक येईल असे सांगितले. तेव्हा शिंगटेंनी आमच्या समोरच शंभर टन माल भरा असे सांगितले. तेव्हा यादवने तुमच्यासाठी तीन ट्रक लावले आहेत. ट्रक भरल्यांनतर तुम्हाला ट्रक नंबर व ट्रकचालकाचा मोबाइल मिळेल असे सांगितले. खातरजमा करण्यासाठी शिंगटे यांनी इंदूर येथे जावून यादवची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने मी भोपाळला गेल्याचे सांगितले. इंदाेर येथील कोणत्या ट्रॉन्सपोर्टचे ट्रकमध्ये कुठे माल भरल्या जात आहे, याची चौकशी शिंगटेंनी केली असता त्यांना माहितीच दिली नाही. शेवटी शिंगटेंनी यादव यांचा व्यवहार कसा आहे याची चौकशी केली. तेव्हा कुठल्याही प्रकारचा परवाना यादव यांच्याकडे नसल्याचे समोर आले. गेल्या वर्षभरापासून आष्टी पोलिसांत शिंगटे हे तक्रार देत होते. परंतु पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नव्हता. शेवटी शिंगटे यांनी आष्टी न्यायालयात धाव घेतली. आष्टी न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशावरून आष्टी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बी. यू. मोरे तपास करत आहेत.

इंदूरच्या व्यापाऱ्यांसह दोन दलालांवर गुन्हा दाखल

माल मिळाला नाहीतर दंड देऊ : या प्रकारांनतर शिंगटे यांनी व्यापारी विजय यादव व दलाल विठ्ठल साेनवने यांना आष्टी येथे १८ जानेवारी २०१९ रोजी बोलावुन घेतले. मी मागणी केलेल्या मालाचा पुरवठा मला करा अन्यथा माझी रक्कम मला परत द्या असे शिंगटे यांनी यादव व सोनवने यांना सांगीतले . शेवटी चर्चा करून संमतीपत्र करून दहा हजार मेट्रिक टन गव्हाचा पुरवठा करण्याएैवजी पाच हजार मेट्रीक टन गव्हाचा पुरवठा करण्याचे सांगीतले.

दुसऱ्याच व्यापाऱ्याकडून माल पाठवला

इंदोरचे व्यापारी विजय यादवने शिंगटेंना स्वतःकडील माल न पाठवता इंदोर येथील दुसऱ्या व्यापाऱ्याकडून १२ लाख रुपयांचा तीन ट्रक (३० टन) गहू डिसेंबर २०१८ व जानेवारी २०१९ मध्ये आष्टीला पाठवला होता. या पूर्वी ज्या व्यापाऱ्यामार्फत आष्टीत शिंगटे यांना माल पोहोचला होता त्या व्यापाऱ्याशी शिंगटेंनी इंदूरला गेल्यानंतर संपर्क केला असता फसवणुकीचा प्रकार समोर आला. त्यानंतर यादवने शिंगटेंना फोन करणे बंद केले. दुसऱ्या व्यापाऱ्याने माल पाठवला त्या व्यापाऱ्याने शिंगटे यांना पैशाचा तगादा लावला.

१५ लाख अॅडव्हान्स २० कोटी ५० लाख रुपये किंमतीचा १० हजार मेट्रिक टन गहू मिळावा म्हणून शिंगटे यांनी १५ लाख रुपये यादव यांना सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून नोव्हेंबर २०१८ मध्येच दिले होते. आणखी शंभर टन माल भरायचा आहे. तुमच्यासाठी तीन ट्रक लावल्या आहेत. म्हणून यादवने आणखी ३० लाख रूपयांची मागणी केल्याने यादवला ही रक्कमही दिली होती.