आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसे, काँग्रेसचा हात; भाजपने फुलवले कमळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस भाजपला राेखण्याची तयारी करत असताना नाशिक महापालिकेत मात्र काँग्रेस व मनसेने साथ दिल्यामुळे महापाैरपदी सतीश कुलकर्णी तर उपमहापाैरपदी भिकुबाई बागूल यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे पुन्हा सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाले. राज ठाकरे यांनी मनसेला भाजपसाेबत थेट सहभागी हाेण्यासाठी दिलेले अादेश या सर्व समीकरणामुळे भाजपचे महापालिकेत पुन्हा एकदा कमळ फुलले.


सत्ता मिळवण्यात किंगमेकर ठरलेले बाळासाहेब सानप हे भाजपपासून दूर गेल्याने भाजप अल्पमतात अाले हाेते. सानप यांच्यासह जवळपास १३ भाजप नगरसेवक शिवसेनेसाेबत गेल्यामुळे व त्या गटाने उपमहापाैरपदाच्या माध्यमातून सत्तेत थेट सहभागाची तयारी सुरू केल्यामुळे वातावरण फिरले हाेते. विजयाची फिगर ६१ इतकी असताना सेना ३४, भाजप बंडखाेर १३ असे ४७ तर काँग्रेस व राष्ट्रवादी असे १४ असे ६१ नगरसेवकांचे गणित महाशिवअाघाडीसाठी जमल्याचे चित्र हाेते. एेनवेळी दगाफटका नकाे म्हणून एक अपक्ष व अन्य भाजपतील काही नगरसेवकांना तटस्थ ठेवण्याची खेळीही हाेती. मतदानाच्या दिवशी अर्थातच शुक्रवारी सकाळपर्यंत हेच समीकरण कायम असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा महापाैर हाेईल असे चित्र हाेते.मात्र, भाजपने ऐनवेळी बाजी मारली.

सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये धुसफूस
 
काँग्रेसचे काही नगरसेवक बाजूला गेल्यामुळे अाघाडीत धुसफूस सुरू झाली. रिपाइंचा एक धरून ५३ व मनसेचे पाच असे ५८ पर्यंत भाजपचे गणित गेले. त्यात काँग्रेसची मदत भाजपला हाेणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर मग सकाळी साडेदहा वाजता महाशिवअाघाडी दुभंगली. त्यानंतर, चुरशीची अटीतटीची हाेणारी निवडणूक अत्यंत साधी व साेपी झाली. त्यातून पक्षाचे ज्येष्ठ नेते व निष्ठावंत सतीश कुलकर्णी यांना महापाैर तर ज्येष्ठ नगरसेविका भिकुबाई बागूल यांना उपमहापाैरपदासाठी चाल दिली गेली व सभागृहात त्यांची बिनविरोध निवड झाली.
 

बातम्या आणखी आहेत...