आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • By Taking These Seven Measures, You Can Protect Yourself Against Not Just The Corona Virus But Other Diseases

हे सात उपाय केल्यास कोरोना व्हायरसच नव्हे तर इतर तापांपासून आपण करू शकतो स्वत:चे संरक्षण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोन व्हायरस आणि इतर प्रकारचे ताप वाढल्याने जगभरात चिंतेत भर
  • आजारपणापासून स्वत:चे आणि दुसऱ्यांचे रक्षण करा, हे उपाय अवलंबा

नवी दिल्ली - जगभरात कोरोना विषाणू (कोविड-१९) संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे हाेणाऱ्या मृत्यूंमुळे जगाला चिंतेत टाकले अाहे. सध्या त्यावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेपासून जगभरातील सरकारे त्याच्यापासून वाचण्यासाठी उपाय करत आहेत. दूषित वातावरण किंवा आजारी व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर आपल्या चेहऱ्याला हात लावणे, कोरोना विषाणू पसरण्याच्या कारणांपैकी एक आहे. सर्दी, पडसे, खोकला आणि ताप यांसारख्या समस्याही समोर येत आहेत. तर दुसरीकडे होळीचा सण आहे. तुमच्या सणाच्या उत्सवाच्या रंगात भंग येऊ नये म्हणून संसर्गास घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. सावधगिरी आणि सतर्कतेमुळे आपण स्वत:ला कोरोना व्हायरस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या संसर्ग किंवा तापापासून वाचवू शकतो. येथे काही उपाय सांगितले आहेत.आजारपणापासून स्वत:चे आणि दुसऱ्यांचे रक्षण करा, हे उपाय अवलंबा


> आपले हात सतत धूत राहा. हात धुण्यासाठी नियमित अल्कोहोलयुक्त हँड रब किंवा सॅनिटायझरचा वापर करा. साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा.
 

> दिवसातून कमीत कमी दोनदा आपल्या शरीराचे तापमान नक्की तपासा. वारंवार फ्लू किंवा तापासारखे वाटत असेल तर डॉक्टरांना दाखवा.


> आसपास स्वच्छता ठेवा. परिसर जंतुमुक्त ठेवा.


> खाण्या-पिण्याची भांडी, टेबल, खुर्ची नेहमी स्वच्छ ठेवा.


> खोकलताना, शिंकताना रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करा.


> घरातील शौचालय नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
 
> वापरलेले मास्क, टिश्यू पेपर तसेच इतर वापरलेले साहित्य बंद झाकणाच्या कचराकुंडीतच टाका.

बातम्या आणखी आहेत...