आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bye Bye Mig 27 : Pilots From All Over The Country Used To Come To Jodhpur For Training Of MiG 27; The 10 Squadron's CO's Slept Keeping Books Under Head To Dispel Doubts

मिग-27च्या प्रशिक्षणासाठी देशभरातून वैमानिक जोधपूरला येत; शंका निरसनासाठी 10 स्क्वॉड्रनचे सीओ पुस्तके उशाशी ठेवून झोपत असत

2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • मिग-27 चा शेवटचा प्रवास आज प्रथमच मिग-23 बीएन व मिग-27 चे उड्डाण करणारे पाच ज्येष्ठ वैमानिक सांगताहेत अप्रकाशित कथा
  • लढाऊ विमानांची पहिली स्क्वाॅड्रन जोधपूर एअरबेसवर तयार करण्यात आली. योगायोग म्हणजे ही विमाने येथूनच निवृत्त होत आहेत

​​​​​जोधपूर : भारतीय हवाई दलात गेली चार दशके सोनेरी प्रवास केलेले मिग-२७ बहादूर २७ डिसेंबर, शुक्रवारी सकाळी शेवटचे उड्डाण करणार आहे. विंड डाऊन समारंभानंतर जोधपूर येथे २९ स्क्वाॅड्रन स्कॉर्पियोची एकूण ७ विमाने फेज आऊट होतील. रशियाकडून विकत घेतलेले मिग-२३ बीएन मिग-२७ मध्ये बदलले. यानंतर लढाऊ विमानांची सर्वात पहिली स्क्वाॅड्रन जोधपूर एअरबेसवर तयार करण्यात आली. योगायोग म्हणजे ही विमाने येथूनच निवृत्त होत आहेत. या विमानांनी ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रमामध्ये आपल्या शौर्याची चुणूक दाखवून दिली आहे. जोधपूरमध्ये या लढाऊ जेटला सर्वात प्रथम उड्डाण घेणारे हवाई दलातील पाच ज्येष्ठ वैमानिक प्रथमच यासंबंधीच्या अप्रकाशित कथा सांगत आहेत. यामध्ये एअर मार्शल चरणजीतसिंग, एअर व्हाइस मार्शल गुरचरणसिंग भोगन, एअर व्हाइस मार्शल देवेंद्रसिंग (सर्वजण सेवानिवृत्त फायटर पायलट) यांचा समावेश आहे.

१९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानकडून धोका होता. हवाई दलाच्या ताफ्यात फक्त हंटर, इम्पिरियल व मिग-२१ श्रेणीची विमाने होती. १९८० मध्ये तत्कालीन हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस यांनी लढाऊ विमानांच्या कमतरतेसंबंधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितली. पंतप्रधानांनी त्वरित संरक्षण सचिव व अन्य अधिकाऱ्यांना रशियाला पाठवले. काही महिन्यांतच ही विमान विकत घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३६ विमाने विकत घेतली होती. (ही माहिती तत्कालीन एअर चीफ आय. एच. लतीफ यांनी दिली. )

जोधपूरमध्ये तयार झाली स्क्वॉड्रन १०

१९ सप्टेंबर १९८० रोजी आम्हा पाच वैमानिकांना प्रशिक्षणासाठी कझाकिस्तानला पाठवण्यात आले. आम्हाला रशियन भाषा येत नव्हती. तेव्हा काही प्राथमिक बाबी समजून घेत आम्ही रशियन पायलटसोबत प्रशिक्षण घेत होतो. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर आम्ही जोधपूरला परतलो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींकडे मागणी केल्यानंतर त्वरित ३६ विमाने मिळाली : १९७१ च्या युद्धानंतर पाकिस्तानकडून धोका होता. हवाई दलाच्या ताफ्यात फक्त हंटर, इम्पिरियल व मिग-२१ श्रेणीची विमाने होती. १९८० मध्ये तत्कालीन हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल इद्रिस यांनी लढाऊ विमानांच्या कमतरतेसंबंधी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितली. पंतप्रधानांनी त्वरित संरक्षण सचिव व अन्य अधिकाऱ्यांना रशियाला पाठवले.

१० स्क्वॉड्रन तत्कालीन सीओ रतनलाल उशाखाली पुस्तके ठेवून झाेपत असत

१९८१ मध्ये देशभरातून पायलट जोधपूर मिग-२७ चे प्रशिक्षण घेण्यासाठी जोधपूरला येत असत. वैमानिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी तेव्हाचे १० स्क्वॉड्रनचे तत्कालीन सीओ रतनलाल उशाशी पुस्तके ठेवून झोपत असत. यानंतर १९८५ मध्ये मिग-२३ विमान मिग -२७ मध्ये बदलण्यात आले. ही विमाने पूर्णत: सुपरसॉनिक व स्विंग विंग असलेली होती. जोधपूरमध्ये मारूत, मिग-२३, व सुखोई -७ ऐवजी या विमानाने त्यांची जागा घेतली. १९८५ नंतर मिग-२७ ची ६ व मिग-२३ ची ४ स्क्वॉड्रन झाली होती. नंतर चारही मिग-२७ होती. लाल रंगानी रंगवलेल्या दोन विमानांना हेमामालिनी म्हटले जाई. राजपथावर पहिले स्विंग विंग विमान पाहूनच सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. यानंतर डिस्प्लेसाठी दोन विमानांना लाल रंगात रंगवले होते. ही विमाने आकाशात उडत असताना त्यांचे सौंदर्य पाहून लोक या दोन्ही विमानांना हेमामालिनी म्हणत असत. यांचा वेग ताशी १३५० किमी होता. याचा आरपीएम व वेग एकसारखा होता.

ऑपरेशन मेघदूतसाठी ४० अंश तापमानात गरम कपडे घालून केली विमान उड्डाणे

ऑपरेशन मेघदूत दरम्यान हलवारा येथे आमच्या स्क्वॉड्रनला सियाचीनमध्ये रेकी करण्याची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा एअर व्हाइस मार्शल चरणजितसिंग ४० अंश तापमानात गरम कपडे घालून सियाचिनपर्यंत जात असत. पाकिस्तानच्या स्क्राडू भागापर्यंत जाऊन छायाचित्रण करत परत येत असत. या टीमने१९८६ मध्ये प्रथमच ११००० फूट उंचीवर लेह एअरफील्डवर प्रथमच लँडिंग केले.