आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोगाथा : 'BYJU' लर्निंग अॅपचे संस्थापक रवींद्रन यांचा देशातील अब्जाधीशांमध्ये समावेश, 8 वर्षांपूर्वी होते शिक्षक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - ऑनलाइन एज्युकेशन अॅप (BYJU)चे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन देशातील नवे अब्जाधीश बनले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रवींद्रनची कंपनी 'थिंक अॅण्ड लर्न'ने या महिन्यात 15 कोटी डॉलर (1,035 कोटी रुपये) निधी उभारला होता. यामुळे कंपनीचे मूल्य 5.7 अब्ज डॉलर (39,330 कोटी रुपये) झाले आहे. रवींद्रनकडे कंपनीचे 21 टक्क्यांहून अधिक शेअर्स आहेत. शिक्षक असलेल्या रवींद्रनने 2011 मध्ये 'थिंक अॅण्ड लर्न'ची स्थापना केली होती. तर 2015 मध्ये मुख्या लर्निंग अॅप 'बायजू' लॉन्च केले होते. 

 

रवींद्रन परिवाराकडे बायजूचे 35% शेअर्स
> बायजूचे 3.5 कोटी सब्सक्रायबर्स आहेत. यातील 24 लाख पेड युझर्स आहेत. ते दरवर्षी 10 ते 12 हजार रुपये फी जमा करतात. यावर्षी मार्चपर्यंत बायजू नफ्यात आली होती. यादरम्यान रवींद्रनने पेन्शन फंड आणि सॉवरेन वेल्थ फंड सारख्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. अलीकडे कतार गुंतवणूक प्राधिकरणाने त्यांच्या कंपनीत पैसे गुंतविले आहेत.


> आपली भागिदारी कायम ठेवण्यासाठी बायजूने मागील फंडिंगवेळी रवींद्रनने स्वतः शेअर्स खरेदी केले होते. ब्लूमबर्गच्या सुत्रांनुसार रवींद्रन, पत्नी आणि भावाकडे बायजूचे 35% शेअर्स आहेत. 

 

> स्वस्त स्मार्टफोन आणि इंटरनेट प्लॅनमुळे देशात ऑनलाइन लर्निंग वाढत आहे. रवींद्रनचे म्हणणे आहे की, ऑनलाइन लर्निंगमध्ये बायजू जोमाने पुढे जात आहे. मार्च 2020 पर्यंत बायजूची वार्षिक उलाढाल दुप्पट होऊन 3 हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याची आशा आहे. ऑनलाइन लर्निंग इंडस्ट्रीच्या वाढीने नॅस्पर्स व्हेंचर्स, टेनसेन्ट होल्डिंग्स, सिक्योइया कॅपिटल आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 


> बायजू कंटेटला लहान आणि आकर्षक बनवून मुलांचे लक्ष वेधून घेते. रवींद्रन इंग्लिश स्पीकिंग देशांत आपले जाळे पसरवू इच्छित आहेत. बायजू बॉल्ट डिज्नीसोबत मिळून पुढील वर्षी अमेरिकेत सुविधा सुरू करणार असल्याची रवींद्रनने घोषणा केली होती. 

 

मुलांची संख्या वाढल्यामुळे स्टेडियमवर शिकवण्यास केली होती सुरुवात 
> दक्षिण भारतातील तटवर्ती गावातील रवींद्रनचे आई-वडील शिक्षक होते. रवींद्रन यांचे शाळेत मन रमत नव्हते. ते नेहमीच फुटबॉल खेळण्यासाठी जात असत. नंतर घरी येऊन अभ्यास करत होते. रवींद्रनने इंजिनिअरिंग पूर्ण करून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मदत करू लागले. त्यांच्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या इतकी वाढली की, स्टेडियममध्ये एकाचवेळी हजारो विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे रवींद्रन एक सेलेब्रिटी शिक्षक बनले होते.