आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांची असताना ठरवलेल्या लग्नाला नकार दिल्यामुळे ठोठावला 16 लाखांचा दंड, सीए मुलीने घेतले विष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर (राजस्थान)- राजस्थानमध्ये जोधपूर येथे लग्नाचे वचन पूर्ण न केल्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे चार्टर्ड अकाऊंटंट मुलीने पोलिस स्टेशनमध्येच विषारी पदार्थ खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीच्या आई-वडीलांनी मुलगी 3 वर्षांची असताना तिचे लग्न एका मुलासोबत ठरवले होते.

 

सोमवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिव्या चौधरी (वय 22) 3 वर्षांची असताना जीवराम नावाच्या व्यक्तिसोबत तिचा साखरपूडा झाला होता.  दिव्याने पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही दिवसांपासून जीवरामचे कुटुंब दिव्या आणि तिच्या आई-वडील यांच्यावर दिलेले वचन पुर्ण करण्यासाठी दबाव टाकत होते. काही दिवस झाल्यानंतर दिव्याने लग्नासाठी ठाम नकार दिल्यामुळे स्थानिक ग्रामपंयातीने दिव्याच्या कुटूंबावर 16 लाखांचा दंड ठोठावला. तक्रारीत सांगितल्याप्रमाणे दंडाची रक्कम भरल्यानंतर देखिल जीवरामचे कुटूंब दिव्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु लागले. 

 

या कारणामुळे घेतले केला आत्महत्येचा प्रयत्न

सुत्रांनी सांगितल्यानुसार, दिव्याने दिलेल्या तक्रारीमुळे सरपंचांनी नाराज होवून तिच्यावर 20 लाख रुपये दंड भर अशी नवीन मागणी केली. त्यासोबतच पंचायतीने सामाजिक बहिष्कारापासून वाचण्यासाठी तिच्या कुटुंबाला सार्वजनिकरित्या माफी मागण्यासाठी आणि दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी सांगितले. रविवारी पंचायतीच्या बैठकीअगोदर दिव्या पोलिस स्टेशनमध्ये गेली आणि सर्वांसमोर तिने विष प्राशन केले. दिव्याने सांगितले की, 'मी इतकी घाबरले होते की, मला माझ्या घराबाहेर पडणे अवघड झाले होते. माझे करिअर घडवण्याच्या स्वप्नांना साकार करणे कठिण झाले होते. याशिवाय पंचायतीने हस्ततक्षेप केल्यानंतर देखील मला काही आशा राहिली नव्हती, म्हणून मी आत्महत्येचा प्रयत्न केला.

 

प्रकरणाची चौकशी करणार

डीसीपी (माजी) अमनदीप सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश एससी-एसटी विभागाचे डीएसपी पदाचे अधिकारी नारायण सिंग यांना देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरपंचासोबत जोधपूरचे जिल्हाप्रमुखाचे वडील यांच्यासमवेत पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...