आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएची दाेन डे-नाइट कसाेटीची मागणी; गांगुलीच्या मते सर्वाधिक

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मेलबर्न/कोलकाता : क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाशी दोन डे-नाइट कसोटी खेळण्याची तयारी करत आहे. पुढील वर्षी १४ जानेवारीपासून भारतात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सीएचे अध्यक्ष अर्ल एडिंग्स याबाबतीत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकतात. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने म्हटले की, एका मालिकेत दोन डे-नाइट कसोटी अधिक होतात. एडिंग्सने म्हटले, टीम इंडियाने पहिला दिवस-रात्र कसोटी सामना जिंकला याचा आनंद वाटतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून ते आपल्या या प्रदर्शनाला पुढे नेऊ इच्छितात. अधिक डे-नाइट कसोटी खेळवण्यास तयार नसतील यात काही शंका नाही. मात्र, त्यावर जानेवारीत सविस्तर चर्चा होईल. गंागुलीने म्हटले, अद्याप मी त्याबाबतीत सीएच्या अधिकाऱ्यांकडून काही एेकले नाही. चारपैकी दाेन लढती दिवस-रात्र असतील. डे-नाइट कसोटी पारंपरिक कसोटीला पर्याय ठरू शकणार नाही. आम्ही प्रत्येक मालिकेत एक दिवस-रात्र कसोटी खेळणार आहोत. सीएचे प्रमुख केविन रॉबर्टसने म्हटले की, दोन्ही देशांत पाच सामन्यांची मालिका खेळली आहे.

पंतला धोनीसारखे हाेण्यास १५ वर्षे मेहनत घ्यावी लागेल
 
युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतवर खराब फॉर्ममुळे टीका होत आहे. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने पंतचा बचाव करताना म्हटले की, टीकामधून शिकले पाहिजे व पुढे जायला पाहिजे. धोनीसारखे यश मिळवण्यासाठी त्याला १५ वर्षे लागतील. यापूर्वी कोहलीदेखील पंतच्या पाठीशी राहिला.