आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वन-डे सीरिजचा पहिला सामना खेळला जात आहे. या दरम्यान काही दर्शक नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिजंस (एनआरसी) आणि नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर (एनपीआर) चा विरोध करत असल्याचे दिसून आले. काही तरुण स्डँड्समध्ये 'नो एनपीआर आणि नो एनआरसी' लिहीलेले टी-शर्ट घालून आले होते.
सामन्यादरम्यान काही तरुणाने घोषणाबाजीदेखील केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्नही केला. हे सर्व आंदोलक आयआयटी बॉम्बेचि विद्यार्थी असल्याचे कळाले आहे. स्टँड्समध्ये बसलेल्या या विद्यार्थ्यांच्या टी-शर्टवर एनआरसी आणि एनपीआरचे एक-एक एक्षर लिहीले होते. त्यांच्या घोषणाबाजीनंतर पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.