आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हम कागज़ नहीं दिखाएंगे...

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

हम कागज़ नहीं दिखाएंगे, | ये देश ही अपना हासिल है,
जहां राम प्रसाद भी बिस्मिल है, | मिट्टी को कैसे बांटोगे,
सबका ही खून तो शामिल है, | हम संविधान को बचाएंगे,
हम जन-गन-मन भी जाएंगे, | हम कागज़ नहीं दिखाएं
गे।

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागेतून गुंजलेला “हम कागज़ नहीं दिखाएंगे’चा एल्गार मुंबईत येऊन धडकला, आणि या कायद्याविरोधात राष्ट्रव्यापी सविनय कायदेभंग चळवळीचे बिगुल या ठिकाणी फुंकले गेले... निमित्त होते, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “मुंबई कलेक्टिव्ह’ दोनदिवसीय चर्चासत्राचे. स्वातंत्र्य आणि बहुतत्त्ववादाचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी, धर्मनिरपेक्षतावाद, लोकशाही आणि घटनात्मक हक्कांबद्दलच्या वचनबद्धतेची पुष्टी करण्यासाठी ‘मुंबई कलेक्टिव्ह’ हे व्यासपीठ गेल्या चार वर्षांपासून मुंबईत पाय रोवत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. पण तेव्हा देश कुठल्या दिशेने जाणार आहे हे फारसे स्पष्ट नव्हते. ज्यांना आपण कुठे जाऊन पोहोचणार आहोत याची पूर्ण जाणीव झाली होती, त्यांचा आवाज त्या साऱ्या कोलाहलातून ऐकू येत नव्हता. त्या वेळी मोदी सरकार आल्यानंतर दोनच वर्षांनी ‘मुंबई कलेक्टिव्ह’ हे विविध क्षेत्रांत मूलभूत काम करणाऱ्या अभ्यासक, कलावंत, जिज्ञासू आणि विचारवंतांचे व्यासपीठ उभे राहिले. २०१९ नंतर मात्र समाजात फूट पाडा आणि हिंसा घडवा असे वातावरण उभे राहत असताना, मानवी अधिकार नाकारत ध्रुवीकरणाचे डावपेच आखले जात असताना आणि या देशाच्या सभ्यतेलाच नाकारले जात असताना “मुंबई कलेक्टिव्ह’मधील या सर्व चर्चेच्या मुळाशी होता तो राजकारणाची घडी सरळ करण्याचा, लोकशाही टिकवण्याचा विचार. उजव्या शक्ती प्रबळ झाल्या, राजकीय सत्ताधारी बनल्या याबाबत केवळ बोटे मोडून काहीही होणार नाही. असे का झाले याची कारणमीमांसा करणे आणि आता त्याविरोधात लढणे आवश्यक आहे, हे या व्यासपीठावरून स्पष्टपणे मांडण्यात आले. हिंदूंचा “ह’ आणि मुसलमानांचा “म’ जेव्हा एकत्र येतो तेव्हा “हम’ तयार होतो. मात्र सध्या देशात या “हम’मध्ये फूट पाडण्याचे षड॰यंत्र सुरू आहे. अशा भयावह परिस्थितीत भारतीय संविधान टिकवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे यावर देशभरातील विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांची मते आणि त्याला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तरुणाईंचा पाठिंबा हे “मंुंबई कलेक्टिव्ह’चे फलित होते. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिघावर नेमके काहीतरी चुकतेय, नेहमीची वाट अनोळखी वाटतेय असा एक सूर मध्यम आणि डाव्या विचारसरणीकडे वळलेल्यांमध्ये आहे. नेमके त्यावर बोट ठेवण्याचे काम या वेळच्या परिसंवादांनी केले. टीस, आयआयटी, जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया व राज्यातील अनेक विद्यापीठांतून आलेल्या संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांच्या उपस्थितीत वैचारिक लढ्याच्या पुढच्या दिशा आणि उदारमतवादी, तर्कवादी आवाज पुढे आणण्यासंबंधीची उद्बोधक चर्चा या वैचारिक महोत्सवातून निश्चित करण्यात आली.