आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारित नागरिकत्व कायदा विशिष्ट जाती-धर्माच्या विरोधात नाही, नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर साधला निशाणा

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • नागपुरात नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात लोकाधिकार मंचच्या वतीने काढण्यात आली रॅली

नागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी आज (रविवार) नागरिकत्व कायद्यावरून विरोधकांवर निशाणा साधला. फडणवीस म्हणाले की, "काही राजकीय पक्ष आपल्या फायद्यासाठी चुकीची माहिती आणि अफवा पसरवत आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा विशिष्ट जाती-धर्माच्या विरोधात नाही. या कायद्याचा उद्देश नागरिकांचे नागरिकत्व घेणे नसून त्यांना नागरिकत्व देणे आहे."नागपूर येथे लोकाधिकार मंचच्या वतीने नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात रॅली काढण्यात आली. त्यावेळी फडणवीस बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, "देशभरात लाखो लोक अफवांवर विश्वास ठेवून विरोध करत आहेत. मात्र आता कायद्याच्या समर्थनातही हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत." सुधारित नागरिकत्व कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात धार्मिक अत्याचाराला बळी पडलेल्या बिगर मुस्लिम आश्रितांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे.