आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CAA Protest : Firing Outside Jamia University, The Fourth Such Incident In The Capital Recently

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामिया विद्यापीठाबाहेर पुन्हा गोळीबार, दिल्लीत 4 दिवसांत तिसरी घटना; डीसीपींची केली बदली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जामिया विद्यापीठाच्या गेट नंबर-5वर झाला गोळीबार, येथून काही अंतरावर सुरु होते आंदोलन
  • 30 जानेवारी रोजी जामिया आणि 1 फेब्रुवारीला शाहीन बागमध्ये गोळीबाराच्या घटना
  • जामिया-शाहीन बागमधील गोळीबाराच्या घटनांनंतर दक्षिण-पूर्वचे डीसीपींची केली बदली

नवी दिल्ली - जामिया विद्यपीठाच्या बाहेर रविवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. येथून काही अंतरावर नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू होते. स्कूटीवर आलेल्या हल्लेखोरांनी विद्यापीठाच्या गेट क्रमांक 5 वर हा गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींच्या निवेदनावरून एफआयआर नोंदवला आहे. यापूर्वी, जामिया आणि शाहीन बाग भागात गोळीबार होण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनानंतर निवडणूक आयोगाने रविवारी रात्री डीसीपी दक्षिण-पूर्व चिन्मय बिस्वाल यांची बदली केली.

यापूर्वी 30 जानेवारी रोजी एका हल्लेखोराने जामिया भागात सीएए विरोधात मोर्चा काढणाऱ्या लोकांवर गोळीबार केला होता. यानंतर 1 फेब्रुवारी रोजी शाहीन बागेत एकाने हवेत गोळीबार केला होता. गेल्या चार दिवसांत निषेध स्थळांजवळ गोळीबाराची ही तिसरी घटना आहे.जामियाच्या गेट क्रमांक 7 आणि 5 चे सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणारः पोलिस


एसीपींनी सांगितले की, पोलिसांचे एक पथक घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज घेण्यास जाणार आहे. यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. एफआयआरमध्ये प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले आहे. त्यानुसार, रविवारी रात्री 11:30 वाजता जामियाच्या गेट नंतर-7 कडून स्कूटीवरून दोन जण आले. स्कूटीवर मागे बसलेल्याने गेट नंबर-5वर गोळीबार केला. यानंतर हल्लेखोर होली फॅमिली हॉस्पिटलकडे फरार झाले. रिपोर्ट्सनुसार हल्लेखोर लाल रंगाच्या स्कुटीवर आले होते. एका युवकाने लाल रंगाचे जॅकेट घातले होते. विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलिस स्टेशनला घातला घेराव


या घटनेनंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी जामिया नगर पोलिस ठाण्याला घेराव घातला. मात्र पोलिसांनी तक्रार घेतल्यानंतर आणि एसएचओने स्पष्टीकरण दिल्यानंतर सर्व विद्यार्थी परतले.  

अनुराग ठाकूरच्या 'त्या' विधानानंतर घडल्या घटना


मागील आठवड्यात भाजपा नेता अनुराग ठाकुरने दिल्लीतील एका सभेत लोकांकडून देशाच्या गद्दारांना गोळी मारा असा नारा म्हणून घेतला होता. या विधानानंतरच राज्यात गोळीबारांच्या घटनेत वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने अनुराग ठाकुर यांच्यावर या भाषणाकरिता त्यांच्या प्रचारावार 72 तासांची बंदी घातली होती.