आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायदा(सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चापूर्वी गुरुवारी जामिया विद्यापीठात एका तरुणाने गोळीबार केला. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. तरुणाने 12 पोलिस कर्मचाऱ्यांसमोर बराच वेळ हवेत बंदुक फिरवली आणि गोळीबार केला. यावेळी तरुणाने गोळीबार करताना 'ये लो आजादी'च्या घोषणा दिल्या. या गोळीबारात जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी एम्स ट्रामा सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे.
आरोपी ग्रेटर नोएडाच्या जेवर भागातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने गोळीबार करण्यापूर्वी रामभक्त गोपाल नावाच्या फेसबुक प्रोफाइलवरून फेसबुक लाईव्ह केले होते. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करत आहेत.
जामिया ते राजघाटपर्यंत काढण्यात येणार होता मोर्चा
गुरुवारी जामिया समन्वय समितीने(जेसीसी) सीएए आणि एनआरसीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. हा मोर्चा जामिया ते राजघाटपर्यंत काढण्यात येणार होता. मोर्चा सुरू होण्यापूर्वीच ही घटना घडली.
ओवेसी म्हणाले - मोदींनी आता कपड्यावरून हल्लेखोराला ओळखावे
एआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या घटनेनंतर एक ट्वीट केले की, अनुराग ठाकुर आणि त्यांच्यासोबत सभेतील उपस्थित सर्व देशभक्तांचे द्वेष पसरवण्यामुळे धन्यवाद. आता विद्यार्थ्यांना थेट गोळी घालण्यात येत आहे आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोराला कपड्यावरून ओळखावे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.