आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CAA Protest : Muslim Girl Student Of Pondicherry University Says Denied Entry To Convocation Till President Left

मुस्लिम विद्यार्थिनीने केला आरोप - राष्ट्रपती कोविंद दीक्षांत समारोहात असेपर्यंत मला ऑडिटोरियमच्या बाहेर ठेवले

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थिनीने नागरिकत्व कायद्याला विरोध करत सुवर्णपदक नाकारले
  • नागरिकत्व कायद्याचा विरोधात विद्यार्थ्यांच्या एक गटाने समारोहावर बहिष्कार टाकला

पदुच्चेरी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोमवारी पदुच्चेरी विद्यापीठाच्या 27 व्या दीक्षांत समारोहात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या एका गटाने नागरिकत्व कायद्याविरोधात समारोहावर बहिष्कार टाकला होता. विद्यापीठातील एका मुस्लिम विद्यार्थिनीने दावा केला की, राष्ट्रपती येण्यापूर्वी तिला ऑडिटोरियमच्या बाहेर काढले होते. राष्ट्रपती निघून गेल्यानंतर तिला आत घेण्यात आले. रबीहाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला बाहेर का पाठवले, याबाबत माहिती नाही. बहुतेक ऑडिटोरियममधील लोकांनी पोलिसांकडे माझ्या स्कार्फबाबत तक्रार केली होती. त्यांना जर काही अडचण होती तर त्यांनी मला सांगायला हवे होते. पोलिस मला काही बोलण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेले. राष्ट्रपती ऑडिटोरियम गेल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके प्रदान करत असताना देखील मला आत जाण्याची परवानगी दिली नव्हती. 

नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून नाकारले सुवर्णपदक


रबीहाने एमए (जनसंवाद)मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. दीक्षांत समारोहात तिला या कामगिरीसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार होते. परंतु, विद्यार्थिनीने सुवर्णपदक घेण्यास नकार दिला. रबीहाने सांगितले की, विद्यार्थी नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात देशभरात शांततेने आंदोलन करत आहेत, मात्र पोलिस त्यांच्यावर अत्याचार करत आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांबद्दल माझी सहानुभूती आहे. 

या दीक्षान्त समारंभाला राज्यपाल आणि मुख्यमंत्री देखील उपस्थित होते

या प्रकरणाबाबत विद्यापीठाच्या अधिकारी म्हणाले की, ऑडिटोरियमच्या बाहेर काय घडले याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही. आतमध्ये समारोह उत्तम प्रकारे पार पडला. राष्ट्रपती कोविंद यांच्या व्यतिरिक्त या समारोहात राज्यपाल किरण बेदी आणि मुख्यमंत्री व्ही नारायणसामी सहभागी झाले होते. 

चिदंबरम म्हणाले - यामुळे विद्यार्थिनीच्या अधिकारांवर गदा 


काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी विद्यार्थिनीला दीक्षांत समारोहातून बाहेर काढण्याचा विरोध केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून सांगितले की, सुवर्णपदक विजेच्या विद्यार्थिनीच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.