आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 9 मार्चपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले, सायबर सेल सोशल मीडियावरही पाळत ठेवणार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या अनेक भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे - प्रतीकात्मक फोटो - Divya Marathi
मुंबईच्या अनेक भागात सुरक्षा वाढविण्यात आली आहे - प्रतीकात्मक फोटो
  • मुंबईत 9 मार्चपर्यंत आंदोलन, रॅली, किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमावर बंदी
  • या कारणामुळे मुंबईत लागू केले कलम 144

मुंबई - मुंबईत सोमवारपासून पुढील एका आठवड्यासाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे.  दिल्लीतील हिंसाचारानंतर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. याशिवाय 9 मार्चपर्यंत धरणे, रॅली, किंवा इतर कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे.  पोलिस कायदा 1951 अंतर्गत मुंबई पोलिस उपायुक्तांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रांमध्ये कलम 144 लागू राहणार आहे. यादरम्यान विवाहसोहळा, विवाहाशी निगडीत इतर समारंभ, औपचारिक कार्यक्रम, कंपन्यांच्या औपचारिक बैठका, सहकार समित्यांच्या बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम करण्यास सुट राहणार आहे. 

येथे लागू नसणार कलम 144


व्यवसाय संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि सार्वजनिक मनोरंजनाचे इतर ठिकाणे, न्यायलय, शासकीय-निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने आणि इतर प्रतिष्ठानांना कलम 144 मधून वेगळे ठेवण्यात आले आहे. इत्यादी ठिकाणी कलम 144 लागू राहणार नाही. यामुळे लागू केले कलम 144


मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत शहरात अनेक ठिकाणी विरोध प्रदर्शन झाले. हे प्रदर्शन शांततापूर्ण वातावरणात पार पडले. मात्र रविवारी दिल्लीत अनेक ठिकाणी हिंसेची अफवा परसली, त्यानंतर मुंबई पोलिसांनी सावधगिरी बाळगत हे पाऊल उचलले आहे. यादरम्यान सायबर सेल सोशल मीडियावर पाळत ठेवणार आहे. पोलिसा सुत्रांनुसार मुंबईतील संवेदनशील भागात ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. अनेक ठिकाणी माहिती देणारी यंत्रणा देखील कार्यान्वित केली गेली आहे.एनपीआर आणि सीएए संदर्भात विधानसभेत कोणताही प्रस्ताव नाही: अजित पवार


उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, सीएए आणि एनपीआरमुळे राज्यातील लोकांना काळजी करण्याचे कारण नाही. त्यांनी या मुद्द्यावर 'चुकीची माहिती' पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे. पक्षाच्या संमेलनात संबोधित करत विधानसभेत सीएए आणि एनपीआरविरोधात कोणताही ठराव आणण्याची गरज नसलयाचे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...