आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CAA Protests: Yediyurappa To Follow Yogi Adityanath To Recover Property Damage From Rioters News And Updates

भाजप शासित राज्यांमध्ये आंदोलकांकडूनच वसूली! उत्तर प्रदेशचा कायदा कर्नाटकातही होणार लागू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंगळुरू - आणखी एका भाजप शासित राज्याने आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानाची भरपाई आंदोलकांकडूनच करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध देशभर आंदोलन सुरू असताना कर्नाटक सरकारने यासंदर्भात माहिती जारी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आंदोलकांना फोटो आणि व्हिडिओंमधून शोधून काढले आणि त्यांना नोटीसा बजावून नुकसानीची भरपाई करण्यात आली. उत्तर प्रदेशातील हाच कायदा कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा आपल्या राज्यात सुद्धा लागू करत आहेत. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार असे कर्नाटकच्या महसूल मंत्र्यांनी सांगितले आहे.

कर्नाटकात 19 डिसेंबरपासून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. या दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण लागले, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आणि पोलिस-आंदोलक समोरा-समोर येण्याच्या घटना देखील घडल्या. यात मंगळुरू येथे संतप्त जमावाने पोलिस स्टेशनमध्येच कथितरित्या लूट केली. या दरम्यान, पोलिसांनी गोळीबार सुद्धा केला. पोलिसांच्या या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना भरपाई देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने आंदोलकांकडून आतापर्यंत 50 लाख रुपायंची वसूली करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत. एवढेच नव्हे, तर यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या आंदोलकांनी त्यांना सांगितलेली रक्कम भरली नाही, तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...