सीएए / भारतात सीएएवरून होत असलेला वाद दु:खद बाब, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची प्रतिक्रिया

एखादा स्थलांतरित भारतात स्वतःचा स्टार्टअप​​​​​​​ सुरू करेल आणि भारतीय समाजाला फायदा मिळवून देईल अशी माझी आशा - नडेला

दिव्य मराठी वेब टीम

Jan 14,2020 10:34:00 AM IST

वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सीएए विरोधात देशभरात सुरु असलेले आंदोलन ही दुखद बाब असल्याचे नडेला म्हणाले. बजफीड वेबसाइटचे संपादक बेन स्मिथ यांनी सोमवारी ट्वीट करत याची माहिती दिली.


स्मिथ यांनी सांगितले की, नडेला यांना सीएएवर प्रश्न विचारला असता नडेला म्हणाले की, "भारतात या कायद्याविरोधात जे काही होत आहे ते दुखद आहे. एखादा स्थलांतरित बांगलादेशी भारतात आला आणि येथे पुढची मोठी कंपनी उघडली किंवा इन्फोसिससारख्या कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी झाले तर मला आनंद होईल."


स्मिथ दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हणाले की, "मॅनहॅटनमधील मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात संपादकांशी झालेल्या संभाषणादरम्यान नडेला यांनी आपले मत व्यक्त केले. सत्या नडेला अमेरिकेतील भारतीय वंशाच्या दोन मोठ्या टेक नेत्यांपैकी एक आहे. त्यांच्याव्यतिरिक्त भारताचे सुंदर पिचाई गूगलचे सीईओ आहेत."

सत्या नडेला मूळचे हैदराबादचे आहेत

सत्या नडेला मूळचे हैदराबाद शहरातील आहे. त्यांनी स्मिथसोबत आपल्या बहुसांस्कृतिकतेविषयी संवाद साधला. नडेला म्हणाले की, "आपल्या सांस्कृतिक वारसा मिळालेल्या जागेबाबत गर्व आहे. मी हैदराबादमध्ये मोठा झालो. मला नेहमी वाटते की ही जागा मोठे होण्यासाठी सर्वोत्तम आहे. आम्ही ईद, ख्रिसमस आणि दिवाळी साजरी करत होतो. हे तिन्ही सण आमच्यासाठी मोठे होते."

मायक्रोसॉफ्टने नाडेला यांचे विधान प्रसिद्ध केले

नडेला यांच्या मुलाखतीनंतर मायक्रोसॉफ्ट इंडियाने याबाबत एक विधान जारी केले. यामध्ये नडेला यांनी लिहिले की, "मी स्वतःच्या भारतीय वारसाने मोठा झालो. माझी अशा भारताकडून अशी आशा आहे की, जेथे स्थलांतरित एक यशस्वी स्टार्टअप उघडण्याचे किंवा बहुराष्ट्रीय कंपनी पुढे नेण्याचे स्वप्न पाहू शकेल, ज्यामुळे भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल."


X
COMMENT