आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CAA NRC: Indian Army Chief General Bipin Rawat On Citizenship Amendment Act Protests

हिंसेसाठी लोकांची दिशाभूल करणारा लीडर नसतो, निदर्शनांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागावर लष्कर प्रमुख यांनी केले वक्तव्य

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लष्कर प्रमुख म्हणाले - नेतृत्व करणे सोपे दिसत असले तरी ती एक अतिशय अवघड प्रक्रिया
  • ओवेसी आणि दिग्विजय यांनी जनरल रावत यांना दिले प्रत्युत्तर

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात अनेक ठिकाणी हिंसा झाली. या आंदोलनात अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आंदोलनातील हिंसेबाबत सेना प्रमुख बिपिन रावत यांनी गुरुवारी आपले मत मांडले. ते म्हणाले की, विद्यापीठ आणि महाविद्यालयात हिंसा आणि जाळपोळ करणारे लीडर होऊ शकत नाहीत. खरं तर लीडरशिप तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करते. सीएए आणि एनआरसीविरोधात गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यानंतर दिल्लीतील जामिया आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठात देखील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. 31 डिसेंबर 2019 रोजी निवृत्त होत असलेले जनरल रावत म्हणाले की, "लोकांना भडकावण्याचे काम करणारा लीडर नसतो. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने हिंसक आंदोलन आणि जाळपोळीत जमावाचा भाग बनत असल्याचे आम्ही पाहिले. या जमावाला एक नेतृत्व दिले जात आहे मात्र प्रत्यक्षात ते नेतृत्व नाही. नेतृत्वासाठी अनेक गोष्टी असाव्या लागतात. जेव्हा आपण पुढे जाल तेव्हा प्रत्येकजण तुमच्या मागे येतो. हे इतके सोपे नाही. हे सोपे दिसते, परंतु ही एक अतिशय गुंतागुंतीची घटना आहे. खरं तर जो तुम्हाला योग्य दिशा दिशेला नेतो तोच लीडर असतो."”

ओवेसी आणि दिग्विजय यांनी जनरल रावत यांना दिले प्रत्युत्तर


सेनाप्रमुखांच्या या विधानावर टीका करत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "आपल्या कार्यालयाची सीमा जाणून घेणे देखील एक नेतृत्व असते. नेतृत्व तेच असते जे नागरिकत्व उच्च ठेवते आणि आपण ज्या संस्थेच्या नेतृत्वात आहात त्या संस्थेची अखंडता कायम ठेवते."तर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह म्हणाले की, "मी तुमच्याशी सहमत आहे. मात्र ते देखील लीडर नाहीत जे त्यांच्या अनुयायांना जातीय हिंसाचारात भाग घेण्यास मंजूरी देतात. तुम्ही माझ्या या विधानाशी सहमत आहात?"