आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोएडा - येथील एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करणाऱ्या तरुणीला आपल्या मोबाईलमध्ये प्रायव्हेट फोटो ठेवणे महागात पडले आहे. तरुणीने प्रवासात एक टॅक्सी बुक केली आणि मोबाईल त्यातच विसरून उतरली. हाच स्मार्टफोन त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या हाती लागला. मोबाईल अनलॉक होता. ड्रायव्हरने चेक केले तेव्हा त्या तरुणीचे अनेक न्यूड फोटो आणि खासगी संभाषण दिसून आले. काही तासानंतर तिला आपले मोबाईल टॅक्सीतच राहिल्याचा पत्ता लागला. तिने आपल्या नंबरवर कॉल केला. तेव्हा फोन उचलताच समोरून ड्रायव्हरने तिचे सगळेच न्यूड फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
रात्रीचा चॅट डिलीट करायला विसरले होते...
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या पूर्वसंध्येला ती आपल्या बॉयफ्रेंडसोबत चॅट करत होती. त्याने न्यूड फोटोंची मागणी केली असता तिने ते पाठवले होते. परंतु, रात्री पाठवलेल्या न्यूड सेल्फी ती डिलीट करण्यास विसरली. सकाळी ऑफिसला जाताना तिने कॅब हायर केली आणि उतरताना त्यामध्येच मोबाईल विसरला. फोन अनलॉक असल्याने ड्रायव्हरने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा रात्री झालेला संपूर्ण चॅट आणि फोटो पाहिले. त्याने या फोटोंचा एक व्हिडिओ देखील तयार केला होता. त्याच आधारे ड्रायव्हर तिला ब्लॅकमेल करत होता.
बदनामीच्या भीतीने दाखल केला नाही एफआयआर
पीडित तरुणीने आपले मोबाईल हरवल्यानंतर त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हापासूनच ड्रायव्हरने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने तिने कुठल्याही पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला नाही. परंतु, मैत्रिणींच्या सल्ल्याने पोलिसांत एक एनसी दाखल केली. त्याच आधारे पोलिसांनी तिचे मोबाईल ट्रॅक करून परत मिळवून दिले. तसेच ड्रायव्हरने आपल्या कृत्याची माफी देखील मागितली. परंतु, एफआयआर दाखल झालेला नसल्याने तरुणीच्या सांगण्यावरून त्या ड्रायव्हरला सोडण्यात आले.
या गोष्टी नेहमीच ठेवा ध्यानात...
- सर्वप्रथम अशा परिस्थितीपासून वाचण्याचा उपाय म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये खासगी क्षणांचा किंवा प्रायव्हेट फोटो ठेवूच नये.
- आपल्या स्मार्टफोनमध्ये न्यूड फोटो क्लिक करणारच नाही याची काळजी घ्या. कारण, स्मार्टफोनमध्ये काढलेले फोटो डिलीट केल्यानंतरही रिकव्हर होऊ शकतात.
- तरीही आपल्याकडे अशा प्रकारचे फोटो असतील तर मोबाईल नेहमीच लॉक ठेवा. व्हॉट्सअॅपवर किंवा मेसेजिंग अॅपवर खासगी चॅट होत असेल तर त्या अॅप आणि त्यावर आधारित इमेज गॅलरी नेहमीच वेगळे लॉक टाकून ठेवावे.
- त्यातही आजकाल बऱ्याच नामवंत कंपन्या टॅक्सी सेवा देत आहेत. अशा टॅक्सीमध्ये मोबाईल हरवल्यास वेळीच त्या कंपनीच्या हेल्पलाइनशी संपर्क साधावा. मदत मिळत नसेल तर पोलिसांत तक्रार करण्यासाठी विलंब लावू नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.