आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CAB Protest: Protest Against Cab In North East, West Bengal And Other States Live News And Updates

पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी बस पेटवली, हायवे बंद; ममता बॅनर्जींनी केले शांततेचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता / गुवाहाटी - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या आंदोलनाची झळ ईशान्य भारतासह देशाच्या इतर भागांतही पोहोचली आहे. ईशान्य भारतात गेल्या 6 दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू आहेत. त्यात शनिवारी पश्चिम बंगालमध्ये या विधेयकाच्या विरोधात हजारो नागरिक रस्त्यांवर उतरले. आंदोलकांनी कोलकाताच्या हावडा ब्रिजजवळ उभ्या असलेल्या बसला आग लावली. तसेच रस्ते आणि महामार्ग अडवले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांना शांततेने आणि लोकशाही पद्धतीने व्यक्त होण्याचे आवाहन केले आहे.

दिल्लीतील जामिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या 42 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर विद्यापीठाने सर्वच परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सोबतच, विद्यापीठ प्रशासनाकडून 16 डिसेंबर ते 5 जानेवारी पर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आसाम आणि ईशान्य भारतातील अनेक ठिकाणी इंटरनेट बंज आहे. भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांना सुद्धा हायअलर्ट जारी केला जात आहे.

परदेशींना सतर्क राहण्याचे आवाहन, आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांवर परिणाम
अमेरिका, ब्रिटन, इस्रायलसह फ्रान्सने आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करताना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. सोबतच, ईशान्य भारत, काश्मीर आणि लडाखला जाऊ नये असेही आवाहन करण्यात आले आहे. गुवाहाटीत आंदोलन सर्वात उग्र आहे. या ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष रेल्वे चालवल्या जात आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुवाहाटीत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमिन, गृह मंत्री असदुज्जमान खान यांचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...