आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य कर्मचार्‍यांना नववर्षाची भेट, 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारी कर्मचार्‍यांना सरकारकडून नववर्षाची भेट मिळणार आहे. ती म्हणजे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सातव्या वेतन आयोगाला गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना तब्बल 15 टक्के अर्थात 5 ते 14 हजार रुपयांची पगारवाढ दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

1 फेब्रुवारीला होणार्‍या पगारात मिळेल वाढीवर रक्कम

राज्य कर्मचार्‍यांना 1 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. विशेष म्हणजे कर्मचार्‍यांना 1 फेब्रुवारीला होणाऱ्या पगारात वाढीव रक्कम मिळणार आहे. 1 जानेवारी 2016 पासूनची तीन वर्षांची थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाणार आहे.

 

17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

 राज्यातील 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. त्याद्वारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन मासिक पाच हजार रुपयांनी, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते आठ हजार रुपयांनी तसेच प्रथम व द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन नऊ ते 14 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 42 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...