आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी सोडल्यास वा कामावरून काढल्यास किंवा कंपनी बंद झाल्यास दोन दिवसांच्या आत मिळणार थकीत पगार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आता नोकरी सोडल्यास किंवा नोकरीवरून काढल्यास तसेच कंपनी बंद झाल्याच्या स्थितीत कंपनीला दोन दिवसांच्या आत थकीत पगार द्यावा लागणार आहे. किमान मजुरी विधेयकात ही तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे. त्यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिला किंवा त्याला कामावरून काढले वा कोणत्याही कारणामुळे त्याने नोकरी सोडली किंवा कंपनी बंद झाली तर त्या कर्मचाऱ्याला सुटीचे दिवस वगळता दोन दिवसांच्या आत त्याचा थकित पगार देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. 


सर्व उद्योग क्षेत्रांतील श्रमिकांना तसेच कामगारांना मिळणार किमान मजुरी 
विधेयकानुसार सध्या केवळ अनुसूचित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाच किमान मजुरी दिली जाते, मात्र हा कायदा झाल्यानंतर सर्वच क्षेेत्रांतील कामगारांना किमान मजुरीचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार किमान मजुरीसाठी एक फ्लोअर वेज बनवणार असून त्यापेक्षा कमी मजुरी देता येणार नाही. राज्यांना भौगोलिक स्थिती तसेच इतर परिस्थिती पाहता किमान मजुरी ठरवण्याचा अधिकार असला तरी ती केंद्राच्या आकड्यापेक्षा कमी नसेल. जर एखाद्या राज्यात आधीच निर्धारित मजुरी केंद्रापेक्षा जास्त असेल तर त्या राज्याला ती कमी करता येणार नाही. 


मजुरी निश्चित करणाऱ्या समितीत कामगार प्रतिनिधी 
किमान मजुरी निश्चित करण्याआधी केंद्र सरकार केंद्रीय सल्लागार मंडळाचा सल्ला घेणार आहे. यात राज्यांचेही प्रतिनिधी असतील. विधेयकातील तरतुदीनुसार राज्यांना किमान मजुरी निश्चित करण्याआधी एका समितीची स्थापना करावी लागणार आहे. या समितीत कामगार प्रतिनिधींचाही समावेश असेल. या समितीच्या शिफारशीच्या आधारावरच राज्याला किमान मजुरी निश्चित करण्याचा अधिकार असेल. 
 

पहिल्यांदा दोषी आढळल्यास ५० हजार रुपयांचा दंड 
विधेयकानुसार प्रत्येक पाच वर्षांत राज्यांना किमान मजुरीच्या आकड्याला रिवाइज करावे लागेल. किमान मजुरी संहिता लागू झाल्यानंतर पालन झाले नाही तर कमीत कमी सुनावणी जिल्हा दंडाधिकारी पातळीच्या अधिकाऱ्यासमोर होईल. कंपनी पहिल्यांदा दोषी आढळली तर ५०,००० रुपयांचा दंड करण्यात येईल. पाच वर्षांच्या आत दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास एक लाखाचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...