Politics / मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा; आता शुक्रवारचा मुहूर्त काढला? इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग 

पावसाळी अधिवेशनाच्या आधी खांदेपालट शक्य, राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर

विशेष प्रतिनिधी

Jun 12,2019 09:23:00 AM IST

मुंबई - गेले काही वर्षे होणार-होणार असा गाजावाजा होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जाेरात सुरू झाली आहे. १७ जूनपासून हे अधिवेशन सुरू हाेत आहे. तत्पूर्वी म्हणजे १४ जून राेजी विस्ताराचा मुहूर्त शाेधण्यात आला असून सहा नवे मंत्री शपथ घेतील, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र याबाबत अधिकृत घाेषणा अद्याप तरी करण्यात आलेेली नाही. ‘याबाबत आम्हाला काहीच ठाऊक नाही, माध्यमांकडूनच विस्ताराचे समजते आहे. मुख्यमंत्रीच याबाबत अधिकृत माहिती देऊ शकतील,’ असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


लाेकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्ली दाैऱ्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपच्या उंबरठ्यावर उभे असलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे पुत्र भाजप खासदार सुजय विखे पाटील, काँग्रेसचे बंडखाेर आमदार कालिदास काेळंबकर, अब्दुल सत्तार व राष्ट्रवादी साेडून भाजपत आलेले माजी राज्यमंत्री रणजितसिंह माेहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याच्या बातम्या माध्यमांतून येत आहेत.


प्रशांत बंब, क्षीरसागर, सावे यांच्याही नावांची चर्चा
दिल्लीत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलासंदर्भात चर्चा केल्याचे सांगितले जात होते. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्यात या घडामाेडींना वेग येत असल्याचा दावा भाजपमधील एका गटाकडून केला जात आहे. राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, प्रशांत बंब, जयदत्त क्षीरसागर, अतुल सावे यांची नावे संभाव्य मंत्रिपदासाठी घेतली जात आहेत.

X
COMMENT