आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडूत नोकरीसाठी गेलेल्या 12 दिव्यांगांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘कॅफे एबल’ची परवानगी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थूथुकुडी - तामिळनाडूतील थूथुकडी जिल्ह्याची सध्या जोरदार चर्चा होते आहे. कारण, येथील जिल्हाधिकारी परिसरात दिव्यांगांनी चालवलल्या ‘कॅफे एबल’ रेस्टाॅरंटची लोकप्रियता वाढते आहे. हे रेस्टॉरंट सुरू होण्याची कथाही खूप रंजक आहे. काही दिवसापूर्वी येथील जिल्हाधिकारी संदीप नंदुरी यांच्याकडे १२ दिव्यांग नोकरी मागण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना काही मदत करावी वाटली. त्यांनी थोडा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या दिव्यांगांना कॅफे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. यासाठी त्यांना ४५ दिवस हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षणही दिले. आता येथे १२ दिव्यांग काम करतात. आता जिल्हाधिकारी संदीप नंदुरी येथे आपल्या महत्वाच्या बैठका येथेच घेतात. दरम्यान, त्यांचे जेवणही येथेच होते. कर्मचारीही येथेच जेवणांचा आनंद घेतात. 

सर्वांना सरकारी नोकरी शक्य नाही : डीएम
जिल्हाधिकारी संदीप नंदुरी म्हणाले, मला नेहमी दिव्यांगांकडून नोकरीसाठी अर्ज येत होते. परंतु सर्वांना नोकरी देणे शक्य नव्हते. त्यामुळे एक कॅफे सुरू करण्याबरोबरच त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम बनवले.  कॅफेची एक दिवसाची कमाई  दहा हजार रुपये आहे. कॅफेची कमाई बँकेत जमा होती. त्यानंतरच दिव्यांगांना पगार दिला जातो. 

बातम्या आणखी आहेत...