आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCD चे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या वडिलांचे निधन, वयाच्या 96 वर्षी घेतला अखेरचा श्वास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - CCD चे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ यांचे वडील गंगैह हेगडे यांचे रविवारी दीर्घआजाराने निधन झाले. ते 96 वर्षांचे होते. दीर्घकाळापासून आजारी असल्याने त्यांना शांतावेरी गोपाल गोवडा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी चिकमगलूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गंगैया यांना आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल देखील माहिती नव्हती. व्ही.जी सिद्धार्थ जुलै 29 रोजी नेत्रावती नदीच्या पुलावरून बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनंतर 31 जुलै रोजी ते मंगलुरु येथे नेत्रावती नदीत मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी कथितरित्या आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. सिद्धार्थ यांच्या निधनाच्या जवळपास एक महिन्यानंतर गंगय्या हेगडे यांचे निधन झाले. 

रिपोर्ट्सनुसार, गंगाय्या हेगडे यांनी कर्नाटकातील चिकमगलूर जिल्ह्यातील एका ठिकाणी कॉफी प्लांटरची सुरुवात केली होती. अल्पाधीतच त्यांनी याचे मोठ्या व्यवसायात रुपांतर केले.