आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅफिनयुक्त एनर्जी ड्रिंक्स महागणार, करवाढ शक्य, एनर्जी ड्रिंक्सवर जीएसटी कोल्ड ड्रिंक्सच्या बरोबर ४०% होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॅफिनयुक्त शक्तिवर्धक पेय (एनर्जी ड्रिंक्स) महाग होण्याची शक्यता आहे. यावरील कर वाढवण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या यावर १८ टक्के जीएसटी लागतो. हा वाढवून २८ टक्के केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त १२ टक्के सेसही लावला जाऊ शकतो. अर्थ मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली. जीएसटी दर वाढवल्यानंतर आणि सेस लावण्यात आल्यानंतर एनर्जी ड्रिंक्सवरील कर शीतपेयांच्या (कोल्ड ड्रिंक्स) बरोबरीत होईल. देशात जीएसटी लागू झाल्यानंतर कोल्ड ड्रिंक्सवर २८% जीएसटी आणि १२ टक्के सेस मिळून एकूण कर ४० टक्के होतो. 

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यामध्ये कारसारख्या लक्झरी वस्तूंवर आणि सिगारेट-तंबाखूसारख्या नुकसानदायक वस्तूंवर सेस लावण्याची तरतूद आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, एनर्जी ड्रिंक्स मुले तसेच युवकांच्या आरोग्यास हानिकारक आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही याविषयी इशारा दिला आहे. त्यामुळे यावर जास्त कर लावण्याची आवश्यकता आहे. 

त्यांनी सांगितले की, जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. जर या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला तर यावरील कर वाढवल्यामुळे सरकारला सुमारे १५० कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कन्सल्टन्सी संस्था पीडब्ल्यूसी इंडियाचे अप्रत्यक्ष कर पार्टनर सुमीत लुंकड यांनी सांगितले की, बाजारामध्ये नॉन-अल्कोहोलिक ड्रिंक्सच्या नव्या श्रेणीची विक्री वाढत आहे. या विक्रीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सरकार यावरील कर कार्बोनेटेड पेय पदार्थांच्या बरोबरीत करण्याचा विचार करत आहे. जास्त कर लावल्याने ही उत्पादने महाग होतील. 

सध्या भारतामध्ये १,२०७ कोटींचा एनर्जी ड्रिंक्स बाजार 
सध्या भारतामध्ये १,२०७ कोटींचा एनर्जी ड्रिंक्स बाजार 
१,२०७ कोटी होता २०१७ मध्ये स्पोर्ट‌्स आणि एनर्जी ड्रिंक्सचा बाजार. 
 २१,००० कोटी रुपयांचा आहे कोल्ड ड्रिंक्सचा बाजार. 
६०-६५% भागीदारी स्पोर्ट‌्स-एनर्जी ड्रिंक्समध्ये एनर्जी ड्रिंक्सची 
२२% वार्षिक दराने वाढतोय एनर्जी ड्रिंक्सचा बाजार. 
८५% भागीदारी यामध्ये रेड बुलची, उर्वरित १५ % मध्ये इतर कंपन्या. 
(स्रोत : युरोमॉनिटर इंटरनॅशनल, स्टॅटिस्टा) 

नुकसान होत असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही 
एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. इंग्लंडमध्ये मुलांना अशा ड्रिंक्स विक्री बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. वास्तविक तेथील सायन्स अँड टेक्नोलॉजी समितीने अद्याप तसा वैज्ञानिक पुरावा मिळाला नसल्याने बंदी घालता येत नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरी या ड्रिंक्सच्या पॅकवर मोठ्या अक्षरात 'यामुळे मुलांचे नुकसान होऊ शकते' असे लिहिण्याचा सल्ला समितीने दिला आहे. 

१८ टक्क्यांच्या जागी २८ टक्के जीएसटी लावण्याचा विचार, १२ टक्के सेसही 

बातम्या आणखी आहेत...